शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Omicron Variant : ओमायक्राॅनची धास्ती; नांदेडकरांच्या लसीकरणासाठी रांगा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2021 16:57 IST

Omicron Variant fear : प्रशासनाने हर घर दस्तक अभियान राबवून देखील नागरिक लसीकरणासाठी बाहेर आले नव्हते.

नांदेड : ओमायक्रॉंन (Omicron Variant) या कोरोनाच्या ( Corona Virus ) नव्या व्हेरीयंटची धास्ती नांदेडकरांनी घेतल्याचे चित्र आज पहायला मिळाले. आज सकाळपासूनच शहरातील विविध लसीकरण केंद्रांवर ( Corona Vaccination ) नागरिकांनी रांगा लावल्या आहेत. कालपर्यंत लसीकरणाकडे पाठ फिरवणाऱ्या नांदेडकरांनी आता मात्र लसीकरणाला प्राधान्य दिल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. 

प्रशासनाने हर घर दस्तक अभियान राबवून देखील नागरिक लसीकरणासाठी बाहेर आले नव्हते. मात्र ओमायक्रॉंन या कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटमुळे तिसरी लाट येईल याच्या भितीने नागरिकांनी लसीकरणासाठी गर्दी केल्याचे आज सर्व केंद्रांवर दिसून आले. 

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी २८ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. किरकोळ व घाऊक दुकानदार तसेच मॉल, मोंढा येथे विक्रेत्यांनी त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांचे, स्वत:चे तसेच दुकानातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण केल्याची खात्री करावी. तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. हे लसीकरण झाले की नाही, हे तपासण्याची जबाबदारी मनपा आयुक्तांसह तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. पेट्रोल पंपावरही सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. हॉटेल्स आणि परमिट रूममध्येही येणाऱ्या ग्राहकांचे तसेच कर्मचाऱ्यांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. सेतू सुविधा केंद्रातही ग्राहकांचे लसीकरण केल्याची खात्री करणे गरजेचे आहे. हातगाडीवाले, फळे, भाजीपाला, मांस विक्रेते, आठवडी बाजारातील विक्रेते, हमाल माथाडी कामगार, सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी संस्था, सर्व शाळा-महाविद्यालये, खासगी शिकवणी वर्ग आणि गॅस सिलिंडर पुरवठादार, तसेच स्वस्त धान्य विक्रेते यांनाही लसीकरण करून घेणे बंधनकारक केले आहे.

उपरोक्त सर्व जबाबदार यंत्रणांनी आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांचे स्वत:चे लसीकरण झाले की नाही, याची पडताळणी करावी. कोरोना नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध कारवाई करावी, असेही निर्देश दिले आहेत. सॅनिटायझर, मास्क, थर्मामीटरचा वापर करावा. या सर्व नियमावलींचे उल्लंघन करणाऱ्यास ५०० रुपये दंड ठोठावला जाणार आहे. दुकानदार आदी तसेच संस्था, आस्थापनांना त्या व्यक्तीवरील दंडाव्यतिरिक्त दहा हजार रुपये अतिरिक्त दंड आकारण्यात येईल. तसेच दोन दिवस ती संस्था बंद करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

लसीकरणाशिवाय प्रवाशांची वाहतूक नाहीसार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत असणाऱ्या खासगी व सार्वजनिक प्रवासी वाहनसेवा पुरविणाऱ्या सर्व वाहनचालक, मालकांना लसीकरण बंधनकारक असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य शासनाने नवीन नियमावली जाहीर केली आहे. कोरोनाच्या नव्या धोकादायक व्हेरियंटमुळे संकट वाढले आहे. त्यामुळे १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण वेळेत होणे गरजेचे आहे. वाहनचालक, मालक, प्रवासी यांनी लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या वाहन मालक-चालकांना लसीकरण न केल्यास ५०० रुपये, तर बसच्या चालकांना दहा हजार रुपये दंड आकारण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ऑटो, टॅक्सी, बस, जीप यांनाही ही अट लागू राहणार आहे.

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्याNandedनांदेड