एसटीच्या चालक-वाहकांसह अधिकाऱ्यांनाही मास्कचे वावडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:09 IST2021-02-05T06:09:34+5:302021-02-05T06:09:34+5:30
सुरक्षेच्या दृष्टीने मास्क वापरणे गरजेचे आहे. परंतु, मास्क वापरामुळे श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे आम्ही केवळ गर्दीत अथवा रुग्णालयात जात ...

एसटीच्या चालक-वाहकांसह अधिकाऱ्यांनाही मास्कचे वावडे
सुरक्षेच्या दृष्टीने मास्क वापरणे गरजेचे आहे. परंतु, मास्क वापरामुळे श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे आम्ही केवळ गर्दीत अथवा रुग्णालयात जात असताना तोंडाला रूमाल लावतो. आज मास्क लावण्याचे विसरलो. परंतु, कोरोना मास्कमुळे होत नाही, असे ठामपणे कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे आम्हाला मास्कबाबत संभ्रम आहे. त्यामुळे मास्क वापरत नाही. केवळ गर्दीत तोंडाला रूमाल बांधतो. - कपिलेश्वर जोगदंड, प्रवासी
कोरोना येऊन अनेक महिने लोटले. परंतु, आम्ही शेतात काम करणाऱ्या लोकांना कुठलाही आजार झालेला नाही. उलट या कोराेनामुळे आमचे नुकसान झाले. तसेच ग्रामीण भागात शहरी भागातून हा आजार आला. आजही ग्रामीण भागात लग्न समारंभ तसेच विविध कार्यक्रमांना पूर्वीप्रमाणेच गर्दी होत आहे. कोणीही मास्क अथवा सॅनिटायझरचा वापर करत नाही. तरीही कोरोनाचा प्रसार वाढला नाही. त्यामुळे मास्क अथवा सॅनिटायझरचा वापर करण्याचा सल्ला म्हणजेच संबंधितांचा उद्योग वाढविणे होय. - संतोष नादरे, प्रवासी
कोरोना काळात आणि आजही नित्यनियमितपणे आम्ही मास्क वापरतो. मी डुयटीवर असताना आणि बाहेरही मास्कचा वापर करतो. माझी इम्युनिटी चांगली आहे. परंतु, माझ्या घरी असणारे लहान लेकरं आणि वयस्कांची काळजी म्हणून मी शासन नियमांचे आजपर्यंत पालन करीत आलो आहे. तसेच बसवर ड्युटी करून गेल्यानंतर स्नानही करतो. बऱ्याचवेळा लांबपल्ल्याच्या प्रवासात अनोळखी आजारी व्यक्तींचा संपर्क येतो, त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. - अतिष तोटावार, मास्क वापरणारा वाहक