वीज वितरणची आडकाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:13 IST2020-12-27T04:13:29+5:302020-12-27T04:13:29+5:30
कृषी विभागाच्या योजनेचा लाभ घ्या किनवट - तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरून प्रस्ताव ...

वीज वितरणची आडकाठी
कृषी विभागाच्या योजनेचा लाभ घ्या
किनवट - तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरून प्रस्ताव कृषी कार्यालयात दाखल करण्याचे आवाहन तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर, ट्रॅक्टर संचलीत अवजारे, पॉवर टीलर, कांदाचाळ, शेततळे आदीसाठी अर्ज करावा, असे तालुका कृषी अधिकारी मुंडे यांनी कळविले आहे.
शिनगारे यांची निवड
अर्धापूर - वंचित बहुजन आघाडीच्या तालुका कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. तालुकाध्यक्षपदी आनंद शिनगारे, उपाध्यक्ष नागेश आव्हाड, गंगाधर सूर्यवंशी, केशव जाधव, लिंबाजी गोडबोले, महासचिव राजाराम सरोदे, सुभाष भालेराव, सचिव राजेंद्र कांबळे, सहसचिव महेंद्र कांबळे, संघटक सतीश ढवळे, सहसंघटक रुपेश कांबळे यांची निवड करण्यात आली आहे.
आरोग्य तपासणी
अर्धापूर - राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने अर्धापूरमध्ये महाआरोग्य शिबीर घेण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष डॉ.मुजाहीद खान, कार्याध्यक्ष ॲड.सचिन जाधव, सचिन देशमुख, चंद्रकांत टेकाळे, संदीप राऊत यांची उपस्थिती होती.
जनावरांची आधार नोंदणी
धर्माबाद - करखेली येथे पशूवैद्यकीय दवाखान्यांतर्गत ४ हजार २०० पशूंना बिल्ले मारून आधार नोंदणी करण्यात आली. करखेली, येताळा, इळेगाव, चिकना, समराळा, बाभुळगाव, धानाेरा, येवती, राजापूर, बाचेगाव आदी गावांतील जनावरांची आधार नोंदणी केल्याचे पशूवैद्यकीय अधिकारी डॉ.विकास गडेवार यांनी सांगितले.
काटेरी झुडूपामुळे अपघाताची भीती
माहूर - माहूर गडावर जाण्यासाठी वळणदार मालवाडा घाटात रस्त्याच्या दोन्ही बाजुने काटेरी झुडूपे व गवत वाढल्यामुळे वळणावरील समोरील वाहने दिसत नाहीत. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच अपघात होत आहेत. या मार्गावरील रस्त्याच्या बाजुचे झुडूपे तोडण्याची मागणी होत आहे.
मुले शिक्षणापासून वंचित
मुखेड - तालुक्यात सध्या ऊसतोडणीचा हंगाम सुरू झाला असून ऊस तोडणीसाठी परजिल्ह्यातील कामगार आपल्या कुटुंबासह दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत आलेल्या मजुरांच्या मुलांची संख्याही मोठी आहे. ही मुले शाळेपासून दूर राहील्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
भाविकांची गर्दी
नायगाव बाजार - तिरुमला तिरुपती प्रतीस्वरुप असलेल्या नरसी येथील भगवान बालाजी मंदिरात वैकुंठ एकादशीनिमित्ताने महाअभिषेक पूजा करण्यात आली. यावेळी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. शुक्रवारी पहाटे महाअभिषेक, पूजा व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
ग्रामपंचायतसाठी २५ अर्ज
मुखेड - तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया २३डिसेंबरपासून सुरू झाली असून २४ डिसेंबर रोजी चार ग्रामपंचायतीतील ३५ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये बेटमोगरा सात उमेदवार, बाऱ्हाळी ११, सांगवी बु. ६, बेरळी खु. १ अशा एकूण २५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.