जिल्हा बँकेच्या मतदार यादीत खासदारांच्या नावावरील आक्षेप मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:31 IST2021-02-06T04:31:04+5:302021-02-06T04:31:04+5:30
त्याचवेळी लोहा येथील सहायक निबंधक सहकारी संस्थेच्या अहवालात संस्थेच्या मंजूर उपविधीनुसार संस्थेच्या सभासदांकडे किमान १० आर शेतजमीन व रहिवासी ...

जिल्हा बँकेच्या मतदार यादीत खासदारांच्या नावावरील आक्षेप मंजूर
त्याचवेळी लोहा येथील सहायक निबंधक सहकारी संस्थेच्या अहवालात संस्थेच्या मंजूर उपविधीनुसार संस्थेच्या सभासदांकडे किमान १० आर शेतजमीन व रहिवासी असणे आवश्यक आहे. आजपर्यंत सभासद म्हणून प्रताप पाटील यांनी सातबारा व इतर कागदपत्रे कार्यालयास सादर केली नाहीत. त्यामुळे संस्थेचे सभासद प्रताप पाटील यांचे नाव बँकेच्या अंतिम मतदार यादीत समाविष्ट करणे संस्थेच्या सभा सदस्यत्वाविषयी कागदपत्रांची पडताळणी आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. सुनावणीच्या वेळी प्रताप पाटील यांच्यावतीने वकिलांनी सादर केलेले तलाठी सज्जा जानापुरी यांचा २८ जानेवारी २०२१ चा अहवाल, २९ जानेवारी २०२१च्या सातबारा उताऱ्याची प्रत पाहता खा. पाटील यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करणेबाबतचा आक्षेप लातूरच्या विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था तथा जिल्हा सहकारी बँक निवडणूक अधिकाऱ्यांनी मंजूर केला आहे.
या निर्णयामुळे जिल्हा बँकेची निवडणूक रणधुमाळी सुरू होण्यापूर्वीच राजकीय धुळवड सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.