जिल्ह्यात डेंग्यू रूग्ण संख्या घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:11 IST2021-02-05T06:11:00+5:302021-02-05T06:11:00+5:30
मागील पाच वर्षाच्या तुलनेत गतवर्षी डेंग्यूने एकही रूग्ण दगावला नसल्याचे समोर आले आहे. चौकट- गतवर्षी कोरोनामुळे नागरिकांना घराबाहेर पडता ...

जिल्ह्यात डेंग्यू रूग्ण संख्या घटली
मागील पाच वर्षाच्या तुलनेत गतवर्षी डेंग्यूने एकही रूग्ण दगावला नसल्याचे समोर आले आहे.
चौकट- गतवर्षी कोरोनामुळे नागरिकांना घराबाहेर पडता आले नाही. सर्व यंत्रणा ही कोरोना महामारीशी दोन हात करत होती. अशा वेळी डेंग्यू आजारासंदर्भात महापालिका प्रशासनाने खबरदारी घेऊन काही भागात औषध फवारणी केली होती. तसेच नागरिकांनी घराभोवताली पाणी साचू देऊ नये, घरातील पाण्याचे सर्व साठे आठवड्यातून एकदा रिकामे करावेत. परिसरातील खड्ड्यात पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी, शेततळ्यात नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधून गप्पी मासे साेडावेत. घराच्या छतावरील फुटके डब्बे, टाकाऊ टायर्स, कप, मडकी आदी वस्तुंची विल्हेवाट लावावी, असे आवाहन केले होते.
चौकट- डेंग्यू ताप आजारात रूग्णास सात दिवस तीव्र ताप येतो. डोके, सांधे, स्नायू दुखीचा त्रास होतो. रूग्णास उलट्या होतात. डोळ्याच्या आतील बाजू दुखणे, अंगावर पुरळ येणे, नाक तोंडातून रक्तस्त्राव होणे, अशक्तपणा, भूक मंदावणे, तोंडाला कोरड पडणे ही लक्षणे दिसून येतात.
- डॉ.प्रमोद अंबाळकर, नांदेड