शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मनरेगा मजुरांना आता आठ दिवसांत मजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 00:15 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेवर काम करणाऱ्या मजुरांना आता १५ ऐवजी आठ दिवसांत मजुरी दिली जाणार आहे. २०१८-१९ पर्यंत मजुरांची मजुरी ही १५ दिवसांच्या आत दिली जात होती.

ठळक मुद्देदुष्काळी परिस्थिती, मजुरांना शासन निर्णयाचा लाभ

अनुराग पोवळे।नांदेड : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेवर काम करणाऱ्या मजुरांना आता १५ ऐवजी आठ दिवसांत मजुरी दिली जाणार आहे. २०१८-१९ पर्यंत मजुरांची मजुरी ही १५ दिवसांच्या आत दिली जात होती. २०१९-२० या आर्थिक वर्षात आठ दिवसांच्या आत मजुरी अदा करण्याचे आदेश देण्यात आले आहे.जिल्ह्यात आजघडीला ९४२ कामावर १३ हजार ५१२ मजूर कामावर आहेत. यात यंत्रणांची २४५ तर ग्रामपंचायतीची ६९७ कामे सुरू आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक २ हजार ५८ मजूर किनवट तालुक्यात आहेत. या तालुक्यात १२६ कामे सुरू आहेत. माहूर तालुक्यातही ६८ कामांवर १ हजार ३२० मजूर कार्यरत आहेत तर नायगाव तालुक्यात १०६ कामांवर १ हजार २७८, अर्धापूर तालुक्यात ९४ कामांवर १ हजार ४४२, भोकर तालुक्यात ९४ कामांवर १ हजार ४४२, मुखेड तालुक्यात ५१ कामांवर ४७७ मजूर, बिलोली तालुक्यात ६७ कामांवर ५९५, देगलूर तालुक्यात २९ कामांवर ४३६, हदगाव तालुक्यात ६० कामांवर ९६०, हिमायतनगर तालुक्यात २२ कामांवर ३७३, कंधार तालुक्यात ३४ कामांवर ४४०, लोहा तालुक्यात ३३ कामांवर १ हजार १०, मुदखेड तालुक्यात ५३ कामांवर ४७५, नांदेड तालुक्यात ४८ कामांवर ४४२ आणि उमरी तालुक्यात ५४ कामांवर ७२३ मजूर कार्यरत आहेत.या मजुरांना हजेरीपत्रक संपल्यानंतर आठ दिवसांच्या आत मजुरी देणे बंधनकारक करण्यात आले आहे. यापूर्वी २०१८-१९ च्या अखेरपर्यंत १५ दिवसांच्या आत मजुरी प्रदान करावी लागायची. त्यावेळी मजुरी प्रदान करण्याचे जिल्ह्याचे प्रमाण १०० टक्के होते. आठ दिवसांच्या आत मजुरी प्रदान करण्याचा आदेश आल्यानंतर ही टक्केवारी ६६.२९ टक्क्यांवर आली आहे. यापुढे विहित वेळेत मजुरी अदा न करणाºया संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर विलंबाची जबाबदारी निश्चित करुन शासन निर्णयानुसार ०.६ टक्के विलंबाची रक्कम संबंधितांकडून वसूल करुन ती शासनखाती जमा करण्याचे आदेशही देण्यात आले आहे.जिल्ह्यात १५ दिवसांत मजुरी द्यावी लागत असताना मजुरी प्रदान करण्याचे प्रमाण १०० टक्के होते. आठ दिवसांत मजुरी देण्याचे आदेश आल्यानंतर नांदेड तालुक्याचे मजुरी अदा करण्याचे प्रमाण सर्वाधिक ८८.७४ आहे तर त्याखालोखाल मुदखेडचे तालुक्याचे प्रमाण ८६.७१ इतके आहे. सर्वात कमी प्रमाण भोकर तालुक्याचे असून आठ दिवसांत मजुरी देण्याची टक्केवारी ४०.१८ टक्के इतके आहे. आठ दिवसांत मजुरी देण्याचे आदेश दिल्यानंतर जिल्ह्यातील मजुरांना दुष्काळी परिस्थितीत त्याचा लाभ होणार आहे.सहा तालुक्यांत ७४ ग्रा.पं.मध्ये कामच नाहीजिल्ह्यात २०१८-१९ मध्ये दुष्काळाची परिस्थिती होती. या परिस्थितीत ग्रामपंचायतीमार्फत मनरेगाची कामे हाती घेणे आवश्यक होते. मात्र तब्बल ७४ ग्रामपंचायतींनी मनरेगाअंतर्गत एकही काम हाती घेतले नाही. यात दुष्काळी तालुके म्हणून ओळखल्याजाणाºया मुखेड, लोहा तालुक्यासह नांदेड तालुक्यातील सर्वाधिक ग्रामपंचायतींचा समावेश आहे.नांदेड तालुक्यातील ७३ पैकी १९ ग्रामपंचायतींनी २०१८-१९ मध्ये एकही काम केले नाही तर मुखेड तालुक्यातील १८ आणि लोहा तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींनी मनरेगाअंतर्गत काम हाती घेतले नाही. कंधार तालुक्यातील ८, बिलोली तालुक्यातील २, धर्माबाद तालुक्यातील २, किनवट तालुक्यातील ४, मुदखेड तालुक्यातील २ आणि हदगाव तसेच माहूर तालुक्यातील प्रत्येकी एका ग्रामपंचायतीचा काम करण्यामध्ये समावेश आहे

टॅग्स :Nandedनांदेडdroughtदुष्काळGovernmentसरकारNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेडcollectorजिल्हाधिकारी