मतदानावेळी थांबावे लागणार नाही जास्त वेळ रांगेत, १२ राज्यांत मतदान केंद्र वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 12:40 IST2025-10-30T12:40:14+5:302025-10-30T12:40:14+5:30
बिहारने ही मोहीम आधीच पूर्ण केली असून, ते देशातील पहिले राज्य ठरले आहे.

मतदानावेळी थांबावे लागणार नाही जास्त वेळ रांगेत, १२ राज्यांत मतदान केंद्र वाढणार
नवी दिल्ली: पुढील आठवड्यात होणाऱ्या मतदारयाद्यांच्या विशेष पुनरावलोकन मोहिमेनंतर १२ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान केंद्रांची संख्या वाढविली जाणार आहे. त्यामुळे मतदारांना मतदानावेळी फार वेळ रांगेत उभे राहावे लागणार नाही.
बिहारने ही मोहीम आधीच पूर्ण केली असून, ते देशातील पहिले राज्य ठरले आहे. बिहारमध्ये आता प्रत्येक मतदान केंद्रावर आता जास्तीत जास्त १,२०० मतदार राहतील. यापूर्वी ही मर्यादा १,५०० मतदारांपर्यंत होती. या प्रक्रियेनंतर बिहारमधील मतदान केंद्रांची संख्या ७७,८९५ वरून ९०,७१२ वर पोहोचली आहे. त्यामुळे इतर राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतही मतदान केंद्रांची संख्या वाढविली जाईल. निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांनुसार, नोव्हेंबर ४ पासून सुरु होणाऱ्या पुनरावलोकन मोहिमेदरम्यान उंच इमारतींमध्ये, निवासी वसाहतींमध्ये व झोपडपट्टी भागांमध्ये नवी मतदान केंद्रे स्थापन केली जातील. जिल्हा निवडणूक अधिकारी याबाबत राजकीय पक्षांशी चर्चा करतील. एकाच कुटुंबातील सदस्यांना एकाच मतदान केंद्रावर ठेवले जाईल.
प्रदेशांतही मतदान केंद्रांची संख्या वाढविली जाईल. निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांनुसार, नोव्हेंबर ४ पासून सुरु होणाऱ्या पुनरावलोकन वसाहतींमध्ये व झोपडपट्टी भागांमध्ये मोहिमेदरम्यान उंच इमारतींमध्ये, निवासी नवी मतदान केंद्रे स्थापन केली जातील. जिल्हा निवडणूक अधिकारी याबाबत राजकीय पक्षांशी चर्चा करतील. एकाच कुटुंबातील सदस्यांना एकाच मतदान केंद्रावर ठेवले जाईल.
केरळात काँग्रेसचा विरोध
वायनाड : केरळात मतदार यादींच्या विशेष पुनरावलोकन मोहिमेच्या अंमलबजावणीला काँग्रेस विरोध करेल, असे खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांनी बुधवारी वायनाड दौऱ्यावेळी जाहीर केले.
पुदुच्चेरीत २४ वर्षांनी सुधारणार मतदारयादी
पुदुच्चेरीः पुदुच्चेरीत २४ वर्षांनंतर विशेष पुनरावलोकन मोहीम होणार आहे. हे काम नोव्हेंबर ४ पासून सुरू होईल, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी पी. जवाहर यांनी दिली.