शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडमध्ये पेट्रोल-डिझेलची 'रेशनिंग'; दुचाकीला ३०० तर चारचाकीला दीड हजार रूपयांची मर्यादा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 16:14 IST

इंधनाचा कोणताही तुटवडा नसताना केवळ अफवांमुळे मागणीत दोन ते अडीच पटीने वाढ झाली आहे.

नांदेड : गेल्या काही दिवसांपासून इंधनाचा तुटवडा होणार असल्याच्या अफवेमुळे नांदेड जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. मात्र, जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठाही नियमित सुरू आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंधनाचा कोणताही तुटवडा नसताना केवळ अफवांमुळे मागणीत दोन ते अडीच पटीने वाढ झाली आहे. या अतिरिक्त ताणामुळे ज्यांना खरोखर इंधनाची गरज आहे, अशा प्रवाशांची नाहक गैरसोय होत आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता इंधन विक्रीवर तात्पुरते निर्बंध (रेशनिंग) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

इंधन विक्रीचे नवे नियम:पंपांवरील गर्दी कमी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आज सर्व पेट्रोल पंप चालकांना आदेश जारी केले आहेत. त्यानुसार, आता विना गिअरच्या दुचाकींना (स्कूटी) २०० रुपये, गिअर असलेल्या दुचाकींना ३०० रुपये आणि चारचाकी वाहनांना जास्तीत जास्त १५०० रुपयांपर्यंतच इंधन दिले जाणार आहे.

कॅनमध्ये इंधन देण्यास बंदी:अनेकांनी मशागतीची कामे नसतानाही शेतकरी मंडळी कॅनमध्ये इंधन भरून नेण्यासाठी गर्दी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर, कोणत्याही व्यक्तीला कॅन किंवा सुट्ट्या स्वरूपात पेट्रोल-डिझेलची विक्री करू नये, असे सक्त आदेश पंप चालकांना देण्यात आले आहेत.

प्रशासनाला सहकार्य करानागरिकांनी नेहमीप्रमाणेच इंधन खरेदी करावे. अनावश्यक साठा करण्यासाठी गर्दी करू नये. ही विनाकारण निर्माण झालेली पॅनिक स्थिती टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे.-राहूल कर्डीले, जिल्हाधिकारी, नांदेड

English
हिंदी सारांश
Web Title : Nanded Rationing Petrol-Diesel: ₹300 for Bikes, ₹1500 for Cars

Web Summary : Nanded introduces petrol-diesel rationing due to panic buying fueled by shortage rumors. Two-wheelers get ₹300, four-wheelers ₹1500 limit. Cans sales are banned. Collector urges normal purchases.
टॅग्स :Fuel Crisisइंधन टंचाईNandedनांदेड