वीज नाही, रॉकेल मिळत नाही, जगावे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:21 AM2021-09-23T04:21:01+5:302021-09-23T04:21:01+5:30

गावठाणची डीपी जळाल्याचे संतराम आलेवाड यांनी सांगितले आहे. वीज वितरणचे कर्मचारी फोनसुद्धा उचलत नाहीत. जर डीपी जळाला असेल ...

No electricity, no kerosene, how to live? | वीज नाही, रॉकेल मिळत नाही, जगावे कसे?

वीज नाही, रॉकेल मिळत नाही, जगावे कसे?

Next

गावठाणची डीपी जळाल्याचे संतराम आलेवाड यांनी सांगितले आहे. वीज वितरणचे कर्मचारी फोनसुद्धा उचलत नाहीत. जर डीपी जळाला असेल तर कधी बसविणार आहात. तत्काळ डीपीच्या जळालेल्या फ्यूज बदलाव्यात किंवा डीपी जळाला तर तो आजच सायंकाळपर्यंत बसवावा, अशी मागणी सवना गावकऱ्यांनी केली. दोन दिवसांच्या सततच्या पावसाने कापलेले तालुक्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन गेल्यात जमा आहे. सवना येथील गावकऱ्यांना वीज वितरण कंपनीचे कर्मचारी चांगली सेवा देत नाहीत. पिण्याच्या पाण्याचे वीज नसल्यामुळे हाल होणार आहेत. आधीच पावसाळा आहे. ८० टक्के दूषित पाण्यामुळे आजार होतात. ग्रा. पं.ने ठराव देऊन इंजिनिअरला नवीन डीपी व चाळीस वर्षांखालील अल्युमिनियम तारा बदलणे विषय ठरावात नमूद करावे, असे गजानन गोपेवाड, लक्ष्मण राऊत, संतराम आलेवाड, सुभाष गायकवाड, रामदास फेद्देवाड, विलास बिरकलवार, अनिल भुसाळे, लक्ष्मण पैलेवाड, प्रमोद भुसाळे, माधव कलाणे, आदींसह गावकऱ्यांची मागणी आहे. अन्यथा वीज वितरण कार्यालयावर गावकऱ्यांचा मोर्चा आणावा लागेल, असा इशारा दिला आहे.

शेतकऱ्यांच्या मालाची पक्की पावती द्या

लोकमत न्यूज नेटवर्क

हदगाव : तालुक्यातील सर्व अडत दुकानदारांनी शेतकऱ्यांकडून घेतलेल्या मालाची पक्की पावती द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यांसदर्भात तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

सध्या सोयाबीन, मूग व उडीद, इतर माल विक्री करण्यासाठी बाजारात येत असून, शेतमालाला अडत दुकानदार योग्य भाव देत नाहीत. या मालास माऊचर आहे असे सांगून फुकट भावात विकत घेत आहेत. शेतकऱ्यांच्या मालाला ठरवलेल्या भावाप्रमाणे अडत दुकानदार न घेता मनमानी करून फसवणूक करून माल विकत घेत आहेत. शेतकऱ्यांना पक्की पावतीसुद्धा देत नाहीत. बाजारभावात सोयाबीन तेजीत असतानासुद्धा कमी दराने अडत दुकानदार खरेदी करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास अडत दुकानदार हिसकावून घेत आहेत. बाजार समितीने या अडत दुकानदारावर योग्य ती कारवाई करून त्यांना योग्य भावात माल घेण्याच्या सूचना द्याव्यात, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर आत्माराम पाटील, संदेश पाटील, शिवाजी जाधव, नागोराव सूर्यवंशी, बालाजी नरवाडे, पमू पाटील, विश्वजित पवार, पवनकुमार मोरे, सचिन कदम, संदीप जाधव यांच्या सह्या आहेत.

भोकरफाटा येथे पोलीस चौकीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

अर्धापूर : तालुक्यातील भोकर फाटा दाभड येथील अपघातांना नियंत्रण बसावे यासाठी पोलीस चौकी सुरू करावी या मागणीचे निवेदन देण्यात आले.

अर्धापूर तालुक्यातील भोकर फाटा परिसरात नेहमी वर्दळ असते. हा परिसर राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर असल्यामुळे चोवीस तास या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. सध्या या राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे भोकर फाटा येथे वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे.

भोकर फाटा परिसरात गत पंधरा दिवसांत वाहतुकीमुळे अपघातात येथे दोन युवकांचा मृत्यू झाला आहे. दोन कुटुंबे उघड्यावर आली आहेत. असे अपघात थांबविण्यासाठी नियंत्रण बसावे व वाहतूक सुरक्षित करण्यासाठी येथे कायमस्वरूपी पोलीस चौकीची आवश्यकता आहे. दाभड परिसरातील भोकर फाटा, ता. अर्धापूर येथे कायमस्वरूपी पोलीस चौकी सुरू करण्यात यावी, अशी मागणी दाभड ग्रामपंचायतीचे सदस्य आकाश भगवान सूर्यवंशी यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड यांना निवेदनाद्वारे केली आहे.

Web Title: No electricity, no kerosene, how to live?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.