शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

नांदेडात शिवसेनेला पुनरूज्जीवन?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:44 AM

नांदेड महापालिका आणि त्यानंतर किनवट नगरपालिका निवडणुकीत सफाया झाल्यानंतर मरगळ आलेल्या शिवसेनेला पुनर्जिवित करण्यासाठी नूतन पालकमंत्री रामदास कदम यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यातच शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीला शमवण्याची जबाबदारीही कदम यांच्यावर राहणार आहे.

ठळक मुद्देखांदेपालट : तीन वर्षांत तिसरे पालकमंत्री

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : नांदेड महापालिका आणि त्यानंतर किनवट नगरपालिका निवडणुकीत सफाया झाल्यानंतर मरगळ आलेल्या शिवसेनेला पुनर्जिवित करण्यासाठी नूतन पालकमंत्री रामदास कदम यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यातच शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीला शमवण्याची जबाबदारीही कदम यांच्यावर राहणार आहे.नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पर्यावरणमंत्री रामदास कदम यांची नियुक्ती बुधवारी करण्यात आली. आॅक्टोबर २०१७ मध्ये झालेल्या नांदेड महापालिकेच्या निवडणुकीत प्रचाराची धुरा सांभाळणाºया पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्याकडे आता नांदेडची जबाबदारी दिली आहे. मनपासह किनवट नपमध्येही शिवसेनेचा सफाया झाला आहे. महापालिकेत शिवसेनेच्या गद्दारांना निवडून येवू देणार नाही, अशी जाहीर भूमिका पर्यावरणमंत्री कदम यांनी घेतली होती. भाजपाला रोखण्याच्या प्रयत्नात शिवसेना नांदेड महापालिकेत नावालाच उरली. किनवटमध्ये तर एकही जागा मिळवता आली नाही. तत्कालीन पालकमंत्री राहिलेल्या अर्जुन खोतकर यांनीही नांदेडच्या राजकारणात विशेष असे लक्ष दिले नाही. केवळ बैठका व काही कौटुंबिक सोहळ्यांपुरता खोतकर यांचा नांदेड दौरा राहत असे. ही बाब शिवसैनिकांनाही खटकणारी होती. खोतकर यांच्या विरोधात आमदारांनीही पक्षप्रमुखाकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीनंतर खोतकर हे नांदेडपासून अंतर राखूनच होते. त्यातच त्यांच्या स्वत:च्या आमदारकीचा न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर ते नांदेडपासून पूर्णत: अलिप्त झाले. जवळपास वर्षभराची कारकिर्द राहिलेल्या अर्जुन खोतकर यांना मात्र नांदेडमध्ये शिवसेनेला मजबुती देता आली नाही, हे वास्तव आहे.पालकमंत्री कदम यांच्या नियुक्तीनंतर गोदावरी शुद्धीकरणाच्या उपाययोजनांना वेग येईल, अशी अपेक्षा आहे. गोदावरी शुद्धीकरणामध्ये स्वत: पर्यावरणमंत्री कदम यांनी लक्ष घातले होते.