नांदेडात लग्न जुळत नसल्याने नैराश्यातून तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 18:39 IST2018-12-13T18:37:11+5:302018-12-13T18:39:22+5:30
लग्न जुळत नसल्याने नैराश्यातून कृत्य

नांदेडात लग्न जुळत नसल्याने नैराश्यातून तरुणाची आत्महत्या
नांदेड : लग्न जुळत नसल्याने नैराश्यातून एका ३५ वर्षीय तरुणाने लाकूड कापण्याच्या कटर मशीनने गळा कापून घेऊन आपली जीवनयात्रा संपविली आहे. प्रवीण प्रल्हादराव बंडेवार असे मृताचे नाव असून ही घटना बुधवारी सायंकाळी ५.१५ वाजेच्या सुमारास भाववेश्वर नगर येथे घडली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौफाळा परिसरातील भावेश्वर नगर येथील प्रवीण प्रल्हादराव बंडेवार या ३५ वर्षीय तरुणाचे गेल्या कांही वर्षापासून लग्न जुळत नव्हते. परिणामी, तो मानसिक तणावात होता. यातूनच बुधवारी सायंकाळी ५.१५ वाजेच्या दरम्यान राहत्या घरी लाकूड कापण्याच्या 'कटर' मशीनने गळा कापून घेऊन आत्महत्या केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे.कॉ. साहेबराव मुपडे व नाईक .पो.कॉ. शिवाजी कानगुले हे करत आहेत.