शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

नांदेड ट्रॅक्टर अपघातात तीन लेकुरवाळींच्या मृत्यूने ९ चिमुकले झाले पाेरके, आक्रोशाने सारे सुन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 14:15 IST

Nanded Tractor Accident:आईच्या मृत्यूने किंचळणारे लेकरं, नातेवाइकांचा आक्रोश पाहून अनेकांच्या डोळ्यात आपोआप अश्रू येत होते.

नांदेड : आलेगाव घटनेत तीन लेकुरवाळ्या बायकांसह दोन १८ वर्षांच्या मुलींचा समावेश आहे. या अपघाताने केवळ स्त्रियांचा मृत्यू झाला नाही तर त्यांच्या घरची चूल बंद केली आहे. जवळपास ९ चिमुकले पाेरके झाले आहेत. यामध्ये दोन ते दहा वर्षांच्या मुला-मुलींचा समावेश आहे. घटनास्थळी आलेल्या चिमुकल्यांचा आक्रोश पाहून अनेकांचे डोळे पाणावले होते. 

विहिरीत बुडून मृत झालेल्या ज्योती सरोदे यांना दोन मुलं, एक मुलगी आहे. सपना राऊत यांना दोन मुली, एक मुलगा आणि सरस्वती बुरड यांना दोन मुली, एक मुलगा आहे. त्यातील अनेकांना तर काय घडले? हीदेखील समज नाही. परंतु, ज्यांना आई, मम्मी गेली आणि ती परत कधीच येणार नाही याची समज आहे, त्यांनी हंबरडा फोडत आईसाठी केलेला धावा उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकविणारा होता. आईच्या मृत्यूने किंचळणारे लेकरं, नातेवाइकांचा आक्रोश पाहून अनेकांच्या डोळ्यात आपोआप अश्रू येत होते.

आई वाचली; पण लेक गेलीया अपघातात वाचलेल्यापैकी पुरभाबाई कांबळे यांची मुलगी सीमरण संतोष कांबळे (१८) हिचा मृत्यू झाला. विहिरीतून सुखरूप बाहेर पडल्यानंतर पुरभाबाईला आपली लेक विहिरीतच असल्याचे समजताच तिने विहिरीकडे धाव घेतली. पण, उपस्थितांनी तिला धीर देत एका झाडाखाली सावलीला नेले. मुलीच्या मृत्यूच्या धक्क्याने पुरभाबाईला चक्कर येत असल्याने त्यांच्यावर उपस्थित डॉक्टरांनी प्रथमोपचार केले. या अपघातात कुणाची अनेक चिमुकल्यांची आई, कुणाची बहीण, कुणाची लेक तर कुणाची बायको, सुन गेली. घटनास्थळी धाव घेत येणाऱ्या बायका, नातेवाईक मृतांच्या चांगूलपणाच्या आठवणी काढत हंबरडा फोडत होते.

तीन ठिकाणी करण्यात आली उत्तरीय तपासणीकांचननगर येथील अपघातात मृत्यू पडलेल्या महिलांची संख्या जास्त असल्याने उत्तरीय तपासणी जलदगतीने पूर्ण करण्यासाठी निळा व लिंबगाव येथे प्रत्येकी दोन, तर उर्वरित तीन मृतदेह वसमत येथे पाठविण्यात आले. मजुरीसाठी भल्या पहाटे महिलांना घेऊन शेताकडे निघालेले ट्रॅक्टर ट्रॉलीसह विहिरीत कोसळले. ११ पैकी चौघे वगळता, अन्य सात महिलांना ८० फूट खोल विहिरीत ट्रॉलीखाली अडकून जलसमाधी मिळाली. घटनेच्या सहा तासांनंतर अपघातग्रस्त वाहन व महिलांचे मृतदेह बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले. मृतदेह पाण्यात बराच वेळ राहिले, त्यात एकाच ठिकाणी उत्तरीय तपासणी केल्यास अधिकचा वेळ लागू शकतो, ही बाब लक्षात आणून देत जवळच्या विविध आरोग्य केंद्रांत विभागून उत्तरीय तपासणी करण्याची सूचना वसमतचे आमदार राजू ऊर्फ चंद्रकांत नवघरे यांनी प्रशासनास केली. तद्नंतर कांचननगर येथून जवळ असलेल्या निळा, लिंबगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येकी दोन, तर वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात तीन महिलांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी स्वतंत्र रुग्णवाहिकेतून पाठविण्यात आले.

टॅग्स :AccidentअपघातNandedनांदेडDeathमृत्यू