नांदेड पासपोर्ट सेवा केंद्र श्रेयाच्या चढाओढीत पत्रिकांचा घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 00:25 IST2018-04-08T00:25:20+5:302018-04-08T00:25:20+5:30

नांदेड पासपोर्ट सेवा केंद्राचे रविवारी उद्घाटन होणार आहे़, परंतु श्रेयाच्या चढाओढीत त्यात पत्रिकेमुळे विघ्न आले आहे़ मानापमानाचे नाट्य रंगले असताना एका कार्यक्रमाच्या तीन वेगवेगळ्या पत्रिका काढण्यात आल्या़ त्यामुळे नवीनच वादाला तोंड फुटले आहे़

Nanded passport service center gets rid of the newsletter | नांदेड पासपोर्ट सेवा केंद्र श्रेयाच्या चढाओढीत पत्रिकांचा घोळ

नांदेड पासपोर्ट सेवा केंद्र श्रेयाच्या चढाओढीत पत्रिकांचा घोळ

ठळक मुद्देपासपोर्ट सेवा केंद्राचा आज प्रारंभ : एका कार्यक्रमाच्या तीन पत्रिका

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : नांदेड पासपोर्ट सेवा केंद्राचे रविवारी उद्घाटन होणार आहे़, परंतु श्रेयाच्या चढाओढीत त्यात पत्रिकेमुळे विघ्न आले आहे़ मानापमानाचे नाट्य रंगले असताना एका कार्यक्रमाच्या तीन वेगवेगळ्या पत्रिका काढण्यात आल्या़ त्यामुळे नवीनच वादाला तोंड फुटले आहे़
नांदेडकरांना पासपोर्ट सहज व सुलभ उपलब्ध व्हावे यासाठी केंद्र शासनाच्या वतीने नांदेडात पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला़ परंतु त्याच्या उद्घाटन पत्रिकेवरुन मात्र सध्या मोठा गहजब सुरु आहे़ पहिल्या पत्रिकेत दोन्ही विद्यमान आमदारांच्या नावापुढे चक्क संसद सदस्य विधानसभा असा उल्लेख करण्यात आला होता़ शिष्टाचाराचे धिंडवडे उडविणारी ही पत्रिका व्हायरल झाल्यामुळे दुसऱ्यांदा नव्याने पत्रिका छापण्यात आल्या़ त्या पत्रिकेत पालकमंत्री रामदास कदम, खा़ अशोकराव चव्हाण, खा़ राजीव सातव, खा़ सुनील गायकवाड, आ़ हेमंत पाटील, आ़ डी़पी़सावंत, महापौर शीला भवरे आणि मनीष गुप्ता यांचीच नावे होती़ या पत्रिकेवरुनही मोठा गोंधळ निर्माण झाला़ याबाबत शिष्टाचार अधिकाºयांची झाडाझडतीही घेण्यात आली़ त्यानंतर क्रमांक दोनच्या पत्रिकांचे वाटप थांबविण्यात आले़ त्यानंतर शनिवारी सकाळी तिसरी पत्रिका काढण्यात आली़
या पत्रिकेत उपस्थितीमध्ये पालकमंत्री रामदास कदम, उद्घाटन खा़अशोकराव चव्हाण करणार असल्याचे नमूद असून जि़प़अध्यक्षा शांताबाई पवार, खा़राजीव सातव, खा़सुनील गायकवाड, महापौर शीला भवरे, आ़अमरनाथ राजूरकर, आ़हेमंत पाटील, आ़विक्रम काळे, आ़सतीश चव्हाण, आ़डी़पी़सावंत, संयुक्त सचिव मनीष गुप्ता, विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना, मनपा आयुक्त गणेश देशमुख यांची नावे टाकण्यात आली आहेत़ या पत्रिकेवरही काही जणांतून नाराजीचा सूर उमटत आहे़ उद्घाटनापूर्वी पासपोर्ट सेवा केंद्र पत्रिकेच्या घोळामुळे चर्चेत आले आहे़ तर दुसरीकडे डाक अधीक्षक अली यांनी पत्रिकाच छापल्या नसल्याचे सांगितले़ शासकीय कार्यक्रमाच्या पत्रिका न छापताच उद्घाटक, प्रमुख पाहुण्यांना कसे निमंत्रित केले गेले? हा प्रश्नही उपस्थित होतो़

सध्या डिजिटलचा जमाना आहे़ त्यामुळे या कार्यक्रमाची पत्रिका आम्ही छापलीच नाही़ संगणकावर पत्रिका तयार करुन ती व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाठविण्यात येत आहे़ आमदारांचा सांसद सदस्य असा उल्लेख हा ५ तारखेच्या पत्रिकेत होता, अशी प्रतिक्रिया डाक अधीक्षक एस़ एम़ अली यांनी दिली़

Web Title: Nanded passport service center gets rid of the newsletter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.