हदगाव (नांदेड): अतिवृष्टी आणि कयादू-पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे शेती, गुरेढोरे आणि संसार उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने जाहीर केलेली 'प्रति गुंठा ८५ रुपये' ही मदत अत्यंत तुटपुंजी असल्याने करमोडी ग्रामपंचायतीने ती घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. इतके मोठे नुकसान झालेले असताना, ही मदत म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे, असे म्हणत ग्रामपंचायतीने शासनाच्या या धोरणाविरुद्ध ठराव पारित केला आहे.
पिके उद्ध्वस्त, मदतीचा अवमानहदगाव तालुक्यातील करमोडी, शिबदरा, तालंग, उंचाडा, मार्लेगाव यांसारखी कयादू नदीकाठावरील गावे पुरामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. शेतातील ऊस, सोयाबीन, हळद, कापूस ही पिके वाहून गेली असून, जमीन केवळ मशागत केल्याप्रमाणे काळीभोर झाली आहे. सततचा पाऊस आणि धरणातून सोडलेले पाणी यामुळे पुन्हा पुन्हा पूर येण्याची भयानक स्थिती आहे. अशा परिस्थितीत शासनाने प्रति गुंठा केवळ ८५ रुपये मदत जाहीर केल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
ग्रामपंचायतीचा 'ऐतिहासिक' ठरावशासनाच्या या तुटपुंज्या मदतीला विरोध करत करमोडी ग्रामपंचायतीने तातडीने बैठक घेऊन ही मदत नाकारण्याचा ठराव पारित केला आहे. या ठरावाची प्रत ग्रामस्थांनी तहसीलदार, जिल्हाधिकारी तसेच खासदार व आमदारांनाही सुपूर्द केली आहे.
करमोडी ग्रामपंचायतीच्या प्रमुख मागण्या:१. शासनाने जाहीर केलेली प्रति गुंठा ८५ रुपये मदत तात्काळ मागे घ्यावी.२. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्यात यावी.३. पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना १००% नुकसानीचा परतावा द्यावा.४. सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी.
इतर गावेही ठराव घेण्याच्या तयारीतया मागण्यांकडे शासनाने सकारात्मक दृष्टीने न पाहिल्यास शेतकरी तीव्र लढा उभारण्यास भाग पाडले जातील, असा स्पष्ट इशाराही ग्रामपंचायतीने दिला आहे. करमोडी ग्रामपंचायतीने घेतलेल्या या आगळ्यावेगळ्या भूमिकेची तालुक्यात सर्वत्र चर्चा सुरू असून, पैनगंगा नदीकाठावरील इतर गावेही असाच ठराव पारित करण्याच्या तयारीत आहेत.
Web Summary : Karmodi village, Nanded, rejects government's paltry flood relief of ₹85 per guntha. Villagers demand ₹50,000 per hectare, complete crop insurance payouts, and loan waivers, threatening protests if demands are unmet. Other villages are considering similar resolutions.
Web Summary : नांदेड के करमोडी गांव ने सरकार की बाढ़ राहत ₹85 प्रति गुंठा को ठुकराया। ग्रामीणों ने ₹50,000 प्रति हेक्टेयर, पूर्ण फसल बीमा भुगतान और ऋण माफी की मांग की, मांगें पूरी न होने पर विरोध की धमकी दी। अन्य गांव भी इसी तरह के प्रस्तावों पर विचार कर रहे हैं।