शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

नांदेडातून हज विमानसेवा गरजेची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 12:33 AM

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : नांदेडसह परभणी, हिंगोली, यवतमाळ जिल्ह्यातून हज यात्रेला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असून नांदेड येथून हज विमानसेवा सुरू झाली पाहिजे़ यासाठी संबंधित यंत्रणेनी केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांनी केले़नांदेड येथील मुख्य पोस्ट कार्यालयात नव्याने सुरू करण्यात आलेल्या पासपोर्ट सेवा केंद्राच्या उद्घाटन ...

ठळक मुद्देपासपोर्ट सेवा केंद्र सुरू : अशोकराव चव्हाण यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : नांदेडसह परभणी, हिंगोली, यवतमाळ जिल्ह्यातून हज यात्रेला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असून नांदेड येथून हज विमानसेवा सुरू झाली पाहिजे़ यासाठी संबंधित यंत्रणेनी केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांनी केले़नांदेड येथील मुख्य पोस्ट कार्यालयात नव्याने सुरू करण्यात आलेल्या पासपोर्ट सेवा केंद्राच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते़ प्रारंभी खा़ चव्हाण व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पासपोर्ट सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले़मंचावर पुणे येथील क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी अनंत ताकवाले, औरंगाबाद क्षेत्राचे पोस्टमास्तर जनरल प्रणवकुमार, जिल्हाधिकारी अरूण डोंगरे, विदेश मंत्रालयाचे संयुक्त सचिव मनीष गु्प्ता, जि़ प़ अध्यक्षा शांताबाई पवार, उपमहापौर विनय गिरडे आदींची प्रमुख उपस्थिती होती़खा़ अशोकराव चव्हाण म्हणाले, नांदेड येथे पासपोर्ट सेवा केंद्र सुरू झाल्याने शिक्षण, पर्यटन, व्यापार, नौकरीनिमित्त विदेशात जाणाºयांना वेळेत सेवा मिळेल़ नांदेड येथून हज यात्रेसाठी विमानसेवा सुरू झाली पाहिजे़ त्यासाठी लागेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले़ तसेच पासपोर्ट कार्यालयाची इमारत जुनी झाली असून नवीन इमारतीसाठी केंद्राने निधी उपलब्ध करून द्यावा, असे ते म्हणाले़ येणाºया काळात पोस्ट कार्यालयातून बँकीग सुविधा उपलब्ध मिळणार आहे़ त्यामुळे हे केंद्र निश्चित नफा देणारे केंद्र होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला़पोस्टमास्तर जनरल प्रणवकुमार म्हणाले, मिनिस्ट्री आॅफ एक्स्ट्रनल अफेअरसोबत करार झाल्यामुळे पासपोर्ट सुविधा उपलब्ध करून देता आली़ त्यामुळे नांदेडसह परभणी, हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांना आता पुणे, नागपूर येथे जाण्याची आवश्यकता नाही़शहरातक्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी अनंत ताकवाले म्हणाले, लोकाभिमुख प्रशासनासाठी आमचा प्रयत्न असून जनसेवेसाठी सुरू केलेल्या या केंद्राचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले़नांदेडचे पालकमंत्री रामदास कदम यांच्यासह खा़राजीव सातव, खा़सुनील गायकवाड , आणि स्थानिक आमदारांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरविली

टॅग्स :passportपासपोर्टAshok Chavanअशोक चव्हाणcollectorतहसीलदार