शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
4
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
5
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
6
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
7
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
8
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
9
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
10
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
11
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
12
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
13
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
15
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
16
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
17
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
18
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
19
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
20
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
Daily Top 2Weekly Top 5

Nanded: राष्ट्रवादीच्या महासचिवाचे अपहरण करून मारहाण; आजी-माजी आमदारांवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 12:53 IST

मनपाचे माजी विरोधी पक्षनेता आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश महासचिव जीवन घोगरे यांना आर्थिक वादातून मारहाण झाल्याचे पुढे आले. उपचारानंतर घोगरे यांनी नांदेड ग्रामीण ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

नांदेड : मनपाचे माजी विरोधी पक्षनेता आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश महासचिव जीवन घोगरे यांच्या गाडीवर दगडफेक करून त्यांना जबरदस्तीने एका वाहनात नेत मारहाण केली. २२ डिसेंबर रोजी दुपारी घडलेली ही घटना दोन कोटींच्या आर्थिक वादातून झाल्याची माहिती आहे. या प्रकरणात रात्री उशिरा नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून सात जणांना अटक केली आहे.

जीवन घोगरे हे आपल्या इनोव्हा कारमधून ज्ञानेश्वर नगर भागात जात असताना स्कार्पिओ वाहनातून आलेल्या आरोपींनी मारहाण करत जबरदस्तीने त्यांना वाहनात बसवून नेले. सोमवारी दुपारी पावणे एक वाजेच्या सुमारास घडली. त्यानंतर जीवन घोगरे यांचे अपहरण केल्याची अफवा पसरली होती. ग्रामीणचे पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी लगेच घटनास्थळी धाव घेवून सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर काही वेळातच घोगरे यांनी चिंचोलकर यांना संपर्क करून माझे अपहरण झाले नसून आर्थिक व्यवहारासाठी गेल्याचे सांगितले. संशय आल्याने चिंचोलकर यांनी यंत्रणा कामी लावून घोगरे यांचा शोध घेतला असता ते जखमी अवस्थेत आढळून आले.

पोलिस मागावर असल्याचा सुगावा लागल्याने अपहरणकर्त्यांनी अज्ञात स्थळी सोडून पळ काढला तसेच त्यांनीच बंदूकीच्या धाकावर आपण सुरक्षित असल्याचे पोलिसांना सांगायला लावल्याचे घोगरे यांनी जबाबात नमुद केले. घटनेचे गांभीर्य पाहता पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी ग्रामीण ठाण्यात जावून सविस्तर चौकशी केली.

या प्रकरणी शुभम सुनेवाड रा. वसरणी, राहुल दासरवाड रा. मालेगाव, कौस्तुभ रणवीर रा. भावसार चौक, नांदेड, विवेक सूर्यवंशी रा. गणेशनगर, नांदेड, माधव वाघमारे रा. गणेशनगर, नांदेड, मोहंमद अफरोज रा. गिरगाव ता. वसमत, देवानंद भोळे रा.नांदुसा ता. नांदेड यांच्याविरुद्ध बीएनएस २०२३ अन्वये ११८ (१), ३५२, ३५१ (२), ३५१ (३), ४९, १४० (३), १८९ (२), १९१ (२), १९१ (३) शस्त्र अधिनियम १९५९३, २५ नूसार गुन्हा दाखल झाला असून सर्व आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. या तपास पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार, उपअधीक्षक प्रशांत शिंदे, पो. नि. ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मटवाड हे करीत आहेत. या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार, उपअधीक्षक प्रशांत शिंदे, पो. नि. ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मटवाड हे करीत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी-माजी आमदारांवर गंभीर आरोपराष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रतापराव चिखलीकर व दक्षिणचे माजी आमदार मोहन हंबर्डे, प्रविण चिखलीकर यांच्यासोबत माझे आर्थिक व्यवहार होते. या व्यवहारातून तसेच राजकीय वैमनस्यातून अपहरण करण्यात आले. माझ्यासह संपूर्ण कुटूंबाला जीवे मारण्याची धमकी वारंवार आजी-माजी आमदारांकडून देण्यात येत होती, त्यांच्या सांगण्यावरून हा प्रकार घडल्याचे घोगरे यांनी तक्रारीत म्हटले.

राजकीय षडयंत्रया प्रकरणाशी काहीही संबंध नाही. हे राजकीय षडयंत्र आहे. तीन दिवसांपासून मी मतदान, मतमोजणीत व्यस्त होतो. आता देखील मी माळेगाव यात्रेत आहे. या घटनेबाबत मला माध्यमातून माहिती मिळाली. पोलिस तपासात सत्य बाहेर येईल.- प्रतापराव चिखलीकर, आमदार

English
हिंदी सारांश
Web Title : Nanded: NCP Leader Abducted and Assaulted; Ex-MLAs Accused.

Web Summary : NCP leader Jeevan Ghogre was abducted and beaten over financial disputes. Police arrested seven. Ghogre accuses ex-MLAs of threats and involvement. MLA Chikhalikar denies involvement, calling it a conspiracy.
टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसPratap Patil Chikhalikarप्रताप पाटील चिखलीकरCrime Newsगुन्हेगारी