नांदेड : नांदेड महानगरपालिका निवडणुकीत भाजपने ८१ पैकी ४५ जागा जिंकून बहुमत मिळविले आहे. मात्र, या संपूर्ण निवडणुकीत प्रभाग क्रमांक १९ मधील लढत सर्वांत जास्त चर्चेची ठरली. या प्रभागात नात्याला बाजूला सारून सासू आणि सून राजकीय मैदानात एकमेकींसमोर उभ्या ठाकल्या होत्या. या प्रतिष्ठेच्या लढाईत अखेर सासू सरस ठरली असून, त्यांनी सुनेचा चार हजारांहून अधिक मतांनी पराभव केला आहे.
प्रभाग क्र.१९ (वसरणी-कौठा) भाजपने माजी नगरसेवक राजू काळे यांच्या पत्नी अनुराधा काळे यांना उमेदवारी दिली होती, तर त्यांच्या विरोधात शिवसेनेकडून त्यांच्याच चुलत सूनबाई आरती काळे-वैद्य निवडणुकीच्या रिंगणात होत्या. एकाच घरातील या दोन महिलांमध्ये झालेल्या थेट लढतीमुळे ही निवडणूक संपूर्ण जिल्ह्यासाठी कुतूहलाचा विषय बनली होती. प्रचाराच्या सुरुवातीपासूनच या दोघींमध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली. मात्र, अंतिम निकालात मतदारांनी अनुभवावर विश्वास दाखवीत अनुराधा काळे यांच्या पारड्यात कौल दिला. अनुराधा काळे यांना एकूण नऊ हजार ४२४ मते मिळाली, तर आरती काळे यांना ५ हजार १३२ मतांवर समाधान मानावे लागले. सुमारे ४,२९२ मताधिक्य घेऊन सासूने या निवडणुकीत बाजी मारली. या विजयाने काळे कुटुंबातील राजकीय वर्चस्व सिद्ध झाले असून, प्रभाग क्रमांक १९ मध्ये भाजपच्या चारही उमेदवारांनी विजय मिळविला आहे. सध्या राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर या सासू-सुनेच्या आगळ्यावेगळ्या लढतीची आणि सासूने मिळविलेल्या मोठ्या विजयाची जोरदार चर्चा रंगत आहे.
राजकीय पक्षाला मतदारांना कौलमहापालिका निवडणुकीत मतदारांनी राजकीय पक्षाच्या उमेदवारांना अधिक पसंती दिली. तब्बल १३ प्रभागांत मतदारांनी पॅनल टू पॅनल मतदान करून प्रभागातील सर्व एकाच पक्षातील उमेदवार निवडून दिले. या ठिकाणी पाहिजे तेवढे क्रॉस व्होटिंग दिसून आले नाही. याममध्ये सर्वाधिक पॅनलनुसार भाजपच्या पारड्यात मतदारांनी कौल दिला.
प्रभाग चार आणि ९ च्या लढतीही ठरल्या चर्चेच्यामहापालिका निवडणुकीत भाजपने एकाच घरातील पती- पत्नी आणि पिता- पुत्राला उमेदवारी दिली होती. प्रभाग क्रमांक ४ मधून माजी महापौर शैलेजा स्वामी आणि प्रभाग क्रमांक ९ मधून त्यांचे पती किशोर स्वामी यांना उमेदवारी दिली होती, तर प्रभाग क्रमांक ९ मधून माजी महापौर बलविंदरसिंघ गाडीवाले आणि त्यांचे सुपुत्र वीरेंद्रसिंघ गाडीवाले यांना तिकीट देण्यात आले. सुरुवातीला घराणेशाहीवर टीका झाली, मात्र शेवटच्या क्षणी मतदारांनी या उमेदवारांच्या बाजूने कौल देत त्यांना निवडून दिले.
Web Summary : In Nanded, BJP's Anuradha Kale defeated her daughter-in-law in a highly contested municipal election. Kale secured victory in Ward 19 by over 4,000 votes. BJP won 45 of 81 seats. Voters favored political parties, electing entire panels. Family members also won seats.
Web Summary : नांदेड़ में, बीजेपी की अनुराधा काले ने एक ज़ोरदार नगरपालिका चुनाव में अपनी बहू को हराया। काले ने वार्ड 19 में 4,000 से ज़्यादा वोटों से जीत हासिल की। बीजेपी ने 81 में से 45 सीटें जीतीं। मतदाताओं ने राजनीतिक दलों को पसंद किया, पूरे पैनलों को चुना। परिवार के सदस्य भी सीटें जीते।