नांदेड : संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या निकालाकडे लागले आहे. दुपारी दोन ते तीन वाजेपर्यंत निकाल हाती येईल. त्याचवेळी या मतदारसंघाच्या निकालाने राज्याच्या राजकारणाची दिशाही स्पष्ट होणार आहे.संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या विरुद्ध भाजपाचे प्रताप पाटील चिखलीकर यांच्यात थेट लढत झाली. त्याचवेळी याच मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीनेही पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरताना मतदारसंघात चांगलाच प्रभाव पाडला. वंचित बहुजन आघाडीचे प्रा. यशपाल भिंगे यांना किती मते मिळतात, यावरही या मतदारसंघाचा निकाल काहीअंशी अवलंबून राहणार आहे.भाजपानेकाँग्रेसचा गड असलेल्या नांदेडमध्ये थेट अशोकराव चव्हाण यांना आव्हान देताना आम्ही हा गड जिंकू, अशी गर्जना केली आहे. चिखलीकरांच्या रुपाने तगडा तुल्यबळ उमेदवारही दिला होता. या उमेदवाराच्या मागे भाजपाने संपूर्ण शक्ती उभी केली होती तर अशोक चव्हाण यांनी आपला किल्ला शाबूत राखण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली.नांदेड मतदारसंघाच्या निकालाने राज्यातील आगामी राजकारणाची दिशाही स्पष्ट होणार आहे. राज्यात लक्षवेधी ठरलेल्या चव्हाण विरुद्ध चिखलीकर या लढतीकडे राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.कडेकोट बंदोबस्त, १,४२४ पोलीस तैनातचुरशीच्या झालेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघाचा निकाल गुरुवारी लागणार आहे. यावेळी मतमोजणी केंद्र परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी दिली. शहरातील तंत्रनिकेतन महाविद्यालयातील सभागृहात गुरुवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. बुधवारी रात्रीपासूनच मतमोजणी केंद्र परिसरात बंदोबस्त लावण्यात आला आहे. गुरुवारी या परिसरात पोलीस अधीक्षक जाधव यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, जिल्ह्यातील २३ पोलीस निरीक्षक, ४९ पोलीस निरीक्षक, ६५० कर्मचारी आणि जवळपास ७०० गृहरक्षकदलाचे जवान तैनात करण्यात येणार आहेत. मतमोजणी कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी पोलीस दलाकडून घेतली जात आहे. नागरिकांनीही उत्साहाच्या भरात आपल्या हातून कायद्याचा भंग होऊ नये याची दक्षता घेण्याचे आवाहन पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.त्याचवेळी मतदान केंद्र परिसरात गर्दी तसेच उत्साही समर्थकांना आवरण्यासाठी पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे सर्वांनी पालन करावे, कोणीही कायद्याचा भंग करु नये अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे. बंदोबस्तासाठी राज्य राखीव दलाची एक तुकडीही तैनात करण्यात आली आहे.
नांदेडच्या खासदाराचा आज फैसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 00:44 IST
संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या निकालाकडे लागले आहे. दुपारी दोन ते तीन वाजेपर्यंत निकाल हाती येईल.
नांदेडच्या खासदाराचा आज फैसला
ठळक मुद्देमतदार राजाचा फायनल कौल कळणार कोणाच्या विजयाचा होणार जल्लोष ?सकाळी आठपासून सुरू होणार मतमोजणी