शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
6
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
7
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
8
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
9
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
10
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
11
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
12
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
13
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
14
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
15
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
16
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
17
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
18
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
19
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
20
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

Nanded: क्रूरतेची सीमा! एकाच कंटेनरमध्ये ५२ रेड्यांची अवैध वाहतूक; तीन आरोपी ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 19:33 IST

या धडक कारवाईत पोलिसांनी ४५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

- गोविंद टेकाळेअर्धापूर (नांदेड):नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पार्डी (म.ये) टोलनाकाजवळ मंगळवारी दुपारी पोलिसांनी एका १० टायरी ट्रकमधून अवैध पशू वाहतूक उघडकीस आणली आहे. या कंटेनरमधून तब्बल ५२ रेड्यांची क्रूरपणे, विनापरवाना वाहतूक केली जात असल्याचे दिसून आले. या धडक कारवाईत पोलिसांनी ४५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांना संशयितरित्या जनावरांची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या पथकाने तात्काळ पार्डी टोलनाकाजवळ सापळा रचला. क्रूरता: कंटेनर (क्र. के.ए.०१ ए.एम.८५३६) थांबवून तपासणी केली असता, त्यात ५२ रेडे आढळून आले. विशेष म्हणजे, क्षमतेपेक्षा जास्त आणि अतिशय निर्दयपणे जनावरे क्रूरपणे कोंबून वाहतूक केली जात होती. जनावरांची काळजी घेण्यात कसूर केल्याचे यावेळी दिसून आले. या कारवाईत सुमारे १५ लाख रुपये किमतीचे ५२ रेडे आणि ३० लाख रुपये किमतीचा कंटेनर असा एकूण ४५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तिघे आरोपी ताब्यातपोलीस उपनिरीक्षक परमेश्वर सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून या प्रकरणी हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यात असलेले आरोपी: चालक इरशात पि. इसाक (वय ३३, रा. मेवात, हरियाणा), सुफियान जान मोहम्मद (वय २६, रा. बागपत, उत्तरप्रदेश) आणि हन्नी जान महम्मद (वय २५, रा. मेवात, हरियाणा) या तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Nanded: 52 Buffaloes Illegally Transported in Container; Three Arrested

Web Summary : Police in Nanded seized a container transporting 52 buffaloes illegally. The animals were cruelly confined, exceeding capacity. Three individuals from Haryana and Uttar Pradesh were arrested. The seized assets are worth ₹45 lakh.
टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारी