शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
7
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
8
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
9
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
10
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
11
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
12
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
13
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
14
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
15
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
16
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
17
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
18
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
19
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
20
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत

नायगाव परंपरागत काँग्रेसच्या पाठीशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2019 12:29 AM

विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेनंतर झालेल्या दोन निवडणुकांत नायगाव मतदारसंघ हा काँग्रेस-राष्टÑवादीच्या पाठीशी राहिलेला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नायगाव मतदारसंघात भाजपाला २० हजार मताधिक्य मिळाले.

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीत भाजपला नायगावमध्ये मिळाले २० हजारांचे मताधिक्य

बी. व्ही. चव्हाण।उमरी : विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेनंतर झालेल्या दोन निवडणुकांत नायगाव मतदारसंघ हा काँग्रेस-राष्टÑवादीच्या पाठीशी राहिलेला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नायगाव मतदारसंघात भाजपाला २० हजार मताधिक्य मिळाले. असे असले तरी हा मतदारसंघ नेहमी काँग्रेस व समविचारी पक्षांच्या पाठीशी राहिल्याचे दिसून येते.नायगाव विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर नायगावसह उमरी व धर्माबाद असे तीन तालुके त्यात समाविष्ट करण्यात आले. सन २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार वसंतराव चव्हाण हे ६ हजार मताधिक्य घेऊन विजयी झाले. यावेळी सेनेचे उमेदवार बाबाराव एंबडवार हे मोठ्या फरकाने पराभूत झाले. विशेष उल्लेखनीय म्हणजे यावेळी राम पाटील रातोळीकर यांना भाजपाने उमेदवारी देऊ केली होती. मात्र त्यांनी ही उमेदवारी नाकारली. म्हणून अपक्ष उमेदवार वसंतराव चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेसचे बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांच्यात सरळ लढत झाली. निवडून आल्यानंतर वसंतराव चव्हाण हे काँग्रेसचे सहयोगी सदस्य झाले.मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात आ. वसंतराव चव्हाण यांनी या मतदारसंघावर आपली पकड कायम ठेवली. त्यामुळे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली. यावेळी काँग्रेस व राष्टÑवादी स्वतंत्र लढले. तरीही वसंतराव चव्हाण हे काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले. यावेळी त्यांनी भाजपाचे राजेश पवार यांचा पराभव केला. यावेळच्या मोदी लाटेचा या मतदारसंघात बराच फरक जाणवला. नवखे असणाऱ्या राजेश पवारांनी येथे शेवटपर्यंत चांगलीच झुंज दिली. सलग दुसऱ्यांदा यावेळी बापूसाहेब गोरठेकरांचा पराभव झाला. त्यासोबतच काँग्रेस-राष्टÑवादीतील राजकीय वैमनस्य उफाळून आले. राष्टÑवादी काँग्रेसची भाजपाशी असलेली मैत्री उघडपणे दिसून आली. राष्टÑवादीच्या नेत्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी उघडपणे भाजपाचा प्रचार केला. असे अनेक घटक काँग्रेस उमेदवारांच्या पराभवासाठी येथे कारणीभूत ठरले. होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी विद्यमान आ. वसंतराव चव्हाण हे काँग्रेसतर्फे रिंगणात राहणार आहेत. तशी तयारीही त्यांनी सुरु केली आहे. भाजपाकडून राजेश पवार व मीनलताई खतगावकर ही नावे आघाडीवर आहेत. राजेश पवार यांनी गेल्या पाच वर्षांपासून या मतदारसंघात संपर्क कायम ठेवला. वंचित बहुजन आघाडीकडून भावी उमेदवारीबाबत अजूनतरी कुणाचे नाव पुढे आलेले नाही. मात्र या मतदारसंघातील मतांचे जातनिहाय समीकरण लक्षात घेता लिंगायत, मनेरवारलू अथवा कोळी समाजातील उमेदवार निश्चित होण्याची शक्यता आहे. पक्षीय पातळीवर त्यादृष्टीने चाचपणी सुरू असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांकडून मिळते आहे.

टॅग्स :NandedनांदेडElectionनिवडणूकAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेस