शेतीच्या वादातून सख्ख्या लहान भावाकडून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 19:00 IST2020-07-27T18:59:03+5:302020-07-27T19:00:35+5:30

जबर मारहाण तसेच डोक्यात दगड घालून खून

murdered by a younger brother over an agricultural dispute | शेतीच्या वादातून सख्ख्या लहान भावाकडून खून

शेतीच्या वादातून सख्ख्या लहान भावाकडून खून

ठळक मुद्देया प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली आहे़

हिमायतनगर (जि. नांदेड) : हिमायतनगर तालुक्यातील मौजे सिरंजनी येथे देवीदास परमेश्वर आंबेपवाड (३५) यांचा शेतीच्या वादातून सख्ख्या लहान भावानेच डोक्यात दगड घालून खून केला़ ही घटना २५ जुलै रोजी सायंकाळी घडली़ या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली आहे़

सिरंजनी ते हिमायतनगर रोडवरील एच.पी.गॅस गोडाऊनजवळील जन्नावार यांच्या शेताजवळ अंबादास परमेश्वर आंबेपवाड व दोन साथीदार बाबूराव सखाराम दंतलवाड, रवी मिस्त्री यांनी संगनमत करून २५ जुलैच्या सायंकाळी देवीदास परमेश्वर आंबेपवाड (वय ३५) यांच्यासोबत शेतीच्या वादातून भांडण केले़ 

यावेळी तिघांनी त्यांना जबर मारहाण केली़ तसेच डोक्यात दगड घालून खून केला़, अशी तक्रार मयताची पत्नी सुजाता आंबेपवाड यांनी दिली आहे़ मयताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून हिमायतनगर पोलिसांत तीन आरोपींविरोधात गुन्हा नोंदविला़ रात्रीच पंचनामा करून प्रेत ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते़ पोनि़ भगवान कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी पहाटे सव्वातीन वाजता मुख्य आरोपी अंबादास परमेश्वर आंबेपवाड व त्याच्या दोन साथीदाराला अटक केली़

Web Title: murdered by a younger brother over an agricultural dispute