अंगणात झोपलेल्या तरुणाची हत्या, नांदेड जिल्ह्यातील वाकाची घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 19:36 IST2021-05-17T19:33:22+5:302021-05-17T19:36:51+5:30
उकाड्यामुळे १५ मेच्या रात्री वशिष्ठ हे अंग़णात झोपले होते.

अंगणात झोपलेल्या तरुणाची हत्या, नांदेड जिल्ह्यातील वाकाची घटना
मारतळा (जि. नांदेड) : लोहा तालुक्यातील वाका येथे अंगणात झोपलेल्या तरुणाची हत्या झाली. ही घटना १५ मेच्या रात्री घडली. उस्माननगर पोलिसात या घटनेची नोंद करण्यात आली. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. वशिष्ठ किशन खोसे (वय ३५) असे मयताचे नाव आहे.
उकाड्यामुळे १५ मेच्या रात्री वशिष्ठ हे अंग़णात झोपले होते. त्यांची आई, पत्नी घरात झोपल्या होत्या. अज्ञात इसमांनी वशिष्ठ यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. सकाळी उठल्यानंतर पत्नी व त्यांच्या आई उठून पाहतात, तर वशिष्ठ रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. घटनेची माहिती मिळताच, देगलूरचे उपविभागीय अधिकारी सचिन सांगळे यांनी घटनास्थळी भेट दिली. उस्माननगरचे पोलिस निरीक्षक बी.डी. भुसनुरे, फौजदार बाबासाहेब थोरे यांनीही घटनास्थळी भेट देऊन प्रेत उत्तरीय तपासणीसाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात पाठविले. घटनास्थळी ठसे तज्ज्ञ, श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. श्वानाने माग काढत गावकुशीतील परिसर पिंज़ून काढला. एक दोन ठिकाणी श्वान घुटमळले. मात्र, आरोपी सापडले नाहीत.