जुन्या वादातून तरुणाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:10 IST2021-02-05T06:10:09+5:302021-02-05T06:10:09+5:30
नांदेड - आठ दिवसांपूर्वी झालेल्या वादातून बासंता नगर येथे ३१ जानेवारी रोजी एका तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. ...

जुन्या वादातून तरुणाचा खून
नांदेड - आठ दिवसांपूर्वी झालेल्या वादातून बासंता नगर येथे ३१ जानेवारी रोजी एका तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. या प्रकरणात विमानतळ पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. व्यंकटेश नगर येथील शुभम शिवराम गुरव हा तरुण ३१ जानेवारीच्या रात्री नुरी चौक येथे गेला होता. यावेळी काही दिवसांपूर्वी झालेल्या वादातून चंद्रकांत तारु व एका अल्पवयीन मुलासोबत रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास त्याचा पुन्हा वाद झाला. या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. यामध्ये चंद्रकांत तारु व अल्पवयीन मुलाने शुभमच्या छातीवर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात शुभम गंभीर जखमी झाला होता. त्याच्या मित्रांनी उपचारासाठी त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी रात्री त्याला मृत घोषित केले. या प्रकरणात विमानतळ पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता. पोलिसांनी रात्री उशिरा दोघांनाही अटक केली आहे.