शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

मनपा अधिकारीही आता रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:39 AM

होळी प्रभागातील पाणी पुरवठ्याच्या कामावर चोरीचे पाईप वापरल्याप्रकरणी सोहेल कन्स्ट्रक्शनला काळ्या यादीत टाकल्यानंतर या कामावर नियंत्रण ठेवणाऱ्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिका-यांनाही महापालिका आयुक्तांनी नोटीस बजावल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणात आता पाणी पुरवठा विभागही आयुक्तांच्या रडारवर आला आहे.

ठळक मुद्देआयुक्तांनी बजावली नोटीस : अधिकृत म्हणून दाखविलेले पाईपही चोरीचे ?

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : होळी प्रभागातील पाणी पुरवठ्याच्या कामावर चोरीचे पाईप वापरल्याप्रकरणी सोहेल कन्स्ट्रक्शनला काळ्या यादीत टाकल्यानंतर या कामावर नियंत्रण ठेवणाऱ्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिका-यांनाही महापालिका आयुक्तांनी नोटीस बजावल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणात आता पाणी पुरवठा विभागही आयुक्तांच्या रडारवर आला आहे.होळी प्रभागातील सिद्धनाथपुरी येथे दलितवस्ती निधीतून केल्या जात असलेल्या कामासाठी तेलंगणातील विविध शहरातून चोरुन आणलेले पाईप वापरल्याच्या मनपाच्या चौकशीत पुढे आले. हे प्रकरण गंभीरतेने घेत आयुक्त गणेश देशमुख यांनी प्रारंभी सोहेल कन्स्ट्रक्शनचे काम रद्द केले. त्यानंतर अंतिम नोटीस बजावत खुलासा मागवला. या खुलाश्यात सोहेल कन्स्ट्रक्शनने माध्यमातील वृत्तांचा आपल्या कामाशी कोणताही संबंध नसल्याचे म्हटले होते. पण प्रत्यक्षात उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांनी केलेल्या चौकशीत चोरीचे पाईप प्रत्यक्ष कामावर आढळले होते. या चौकशीनंतर आयुक्तांनी तडकाफडकी कारवाई करत सोहेल कन्स्ट्रक्शनला काळ्या यादीत टाकले. या प्रकरणाचा पोलिसाकडून तपास सुरू आहे. त्याचवेळी पाणी पुरवठा विभागातील अधिकारी, कर्मचारी या सर्व प्रकाराबाबत अनभिज्ञ कसे होते? हा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यांच्यावर कोणतीही जबाबदारी नव्हती का? हा विषय पुढे आला. परिणामी आयुक्त देशमुखांनी गुरुवारी पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे, उपअभियंता रफतउल्ला खान आदींना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. या प्रकरणी खुलासा देण्याचे आदेशही दिले आहेत. त्याचवेळी पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अंधारे यांनीही आपल्या अधिनस्त संबंधित कर्मचाºयांना नोटीस बजावल्या आहेत. त्यामुळे पाईप चोरी प्रकरणात महापालिकेतील कोणत्या अधिकाºयावर जबाबदारी निश्चित केली जाईल याकडे लक्ष लागले आहे.पदाधिकारी धास्तावलेदलितवस्ती निधीतून केल्या जात असलेल्या कामासाठी तेलंगणातून पाईप चोरुन वापरल्याचा प्रकार पुढे आला असून यात रोज नवे खुलासे होत असल्याने महानगरपालिकेतील अधिकाºयांसह पदाधिकारीही धास्तावल्याचे चित्र आहे.पाईप चोरी प्रकरणाची व्याप्ती वाढलीनांदेड : पाईप चोरी प्रकरणात सोहेल कन्स्ट्रक्शनला पुरवठा केलेल्या ५१ पाईपपैकी १७ पाईप हे मेदक येथूनच आणल्याचा संशय बळावला आहे. त्यामुळे या पाईप प्रकरणातील पाळेमुळे आणखीनच रुंदावत आहेत.पाईप चोरी प्रकरणात महापालिकेने अंतिम नोटीस दिल्यानंतर सोहेल कन्स्ट्रक्शनने खुलासा आणि नांदेड येथील विजय इंजिनिअरींग सर्व्हीसेस, महालक्ष्मी कॉम्प्लेक्स, उदयनगर, नांदेड येथून पाईप खरेदीचे देयक सादर केले. या देयकानुसार पुरवठा करावयाच्या १५० पाईप पैकी ५१ पाईप ‘सोहेल’ला पुरवठा करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. पोलिसांनी आपल्या तपासात तेलंगणातून चोरुन आणलेले आणि विजय इंजिनिअरींग सर्व्हीसेसने पुरवठा केलेले ५१ पाईपही जप्त केले होते. १४ मार्च रोजी इतवारा पोलिस ठाण्यात जमा केलेल्या या सर्व पाईपमधून ‘विजय’ने पुरवठा केलेले ५१ पाईप मनपा अधिकारी व ‘विजय’च्या प्रतिनिधींसमोर वेगळे करण्यात आले.या वेगळ्या करण्यात आलेल्या पाईपपैकी ३४ पाईप ‘विजय’ इंजिनिअरींगचे आढळले तर १७ पाईप हे एमडीके अर्थात मेदकचे असल्याची बाब पुढे आली आहे. हे १७ पाईप मेदकचे कसे आहेत? असा प्रश्न पोलिसांनी उपस्थित केला असता समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे चौकशी अधिकारी उपनिरीक्षक नंदकिशोर सोळुंके यांनी सांगितले.दरम्यान, एकत्र केलेल्या पाईपमधील ‘विजय’ने पुरवठा केलेले ५१ पाईप वेगळे करताना बुधवारी दुपारपासून रात्री ९ वाजेपर्यंत केवळ चार पाईप ‘विजय’च्या प्रतिनिधींना सापडले होते. गुरूवारी दुपारपर्यंत हे काम पूर्ण झाले. पण त्यातही आता १७ पाईप हे एमडीके असा ठप्पा असल्याचे सापडले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा गुंता अधिकच वाढत चालला आहे.एकत्र पाईपातून ‘विजय’ने पुरवठा केलेल्या पाईपचा शोध घेताना महापालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी बुधवारी रात्रीपर्यंत होते. गुरुवारी मात्र या कामाकडे मनपाचा एकही अधिकारी फिरकला नाही. हेही विशेष!