महिलेच्या दुकानाची नासधूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 23:56 IST2019-04-04T23:55:25+5:302019-04-04T23:56:59+5:30
तालुक्यातील भुरभुसी येथे एका दुकानदार महिलेच्या दुकानाची नासधूस करुन मारहाण केल्याप्रकरणी ३५ जाणांवर गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेच्या दुकानाची नासधूस
भोकर : तालुक्यातील भुरभुसी येथे एका दुकानदार महिलेच्या दुकानाची नासधूस करुन मारहाण केल्याप्रकरणी ३५ जाणांवर गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील फिर्यादी महिला भागाबाई आडेलू हनमंतकर या किराणा दुकान चालवून उदरनिर्वाह करतात. किराणा दुकानाच्या जागेवरून अनेक वर्षापासून वाद चालू आहे. यातच गावातील काही जणांनी हातात काठ्या, कु-हाड घेवून बुधवारी रात्री दुकानदार महिलेच्या दुकानाची नासधूस करीत जागा रिकामी कर, याठिकाणी आम्हाला देवीचे मंदिर बांधायचे आहे, असे म्हणून मारहाण केली व किराणा सामानाची नासधूस करुन अंदाजे ६० हजार रुपयाचे नुकसान केले. याबाबत फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारी वरुन भुरभुसी येथील सुरेश भालेराव, अनिता भालेराव, अशोक गायकवाड, सत्वशिला गायकवाड यांच्यासह ३५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास जमादार एन.जी. अत्राम करीत आहेत.