मनसे कार्यकर्त्याना पोलिसांनी घेतले ताब्यात, बीआरएसची सभा उधळून लावण्याचा दिला होता इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2023 11:03 IST2023-02-05T11:03:18+5:302023-02-05T11:03:40+5:30
नांदेड मध्ये मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले

मनसे कार्यकर्त्याना पोलिसांनी घेतले ताब्यात, बीआरएसची सभा उधळून लावण्याचा दिला होता इशारा
नांदेड -
नांदेड मध्ये मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. आज नांदेड मध्ये बीआरएस पक्षाची सभा होणार आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची सभा सभा उधळून लावण्याचा इशारा मनसेने दिला होता. मुख्यमंत्री केसीआर यांनी बाभळी बंधाऱ्यातील पाणी वाटपाबाबत भुमिका स्पष्ट करावी नंतर सभा घ्यावी . अशी मनसेची मागणी होती. दरम्यान सभा स्थळी अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणुन पोलीसांनी मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्याना ताब्यात घेतले.