शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

कंधार येथील पोलीस निवासस्थानांची दयनीय अवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 00:38 IST

गंगाधर तोगरे।लोकमत न्यूज नेटवर्ककंधार : शहरासह सुमारे ११८ गावांच्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असणाऱ्या पोलीस कर्मचारी निवासस्थानाची पुरती वाताहत झाली. नवीन घर बांधकामाला कधी मुहूर्त लागणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे़सुमारे साडेचार दशकांपूर्वी बांधलेल्या या घराची वेळेत देखभाल, दुरुस्ती न झाल्याने पोलिसांना भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली. गत काही वर्षांपासून ...

ठळक मुद्दे६५ कर्मचारी, १ एपीआय, ३ पीएसआय, प्रभारी पोलीस निरीक्षक

गंगाधर तोगरे।लोकमत न्यूज नेटवर्ककंधार : शहरासह सुमारे ११८ गावांच्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असणाऱ्या पोलीस कर्मचारी निवासस्थानाची पुरती वाताहत झाली. नवीन घर बांधकामाला कधी मुहूर्त लागणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे़सुमारे साडेचार दशकांपूर्वी बांधलेल्या या घराची वेळेत देखभाल, दुरुस्ती न झाल्याने पोलिसांना भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली. गत काही वर्षांपासून ४० घरे निकामी झाल्याने अस्वच्छता, मातीचे ढिगारे, झाडे झुडुपे, मोकाट जनावरांचा मुक्तपणे वावर दिसतो़ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी साडेचार दशकांपूर्वी पोलीस कर्मचा-यांसाठी अतिशय देखण्या निवासस्थानाची सोय करण्यात आली़ सुमारे ५० कर्मचा-यांना प्रत्येकी तीन खोल्या व अंगण आदी सुविधा असलेले घर देण्यात येत असे़ दोन हजार चाळीस चौरस मीटरवरील या घराने कर्मचा-यांना मोठा दिलासा मिळाला़ परंतु, कालांतराने या वसाहतीची मोठी पडझड सुरू झाली़ दारे-खिडक्या मोडकळीस आल्या़ भिंतीला तडे गेले़ सिमेंटच्या पत्रांना छिद्रे पडली, संरक्षक भिंतीअभावी वसाहतीत मोकाट जनावरांचा मुक्त संचार झाला़ कसेतरी जीव मुठीत धरून राहत असलेली ४० घरे आता भुईसपाट झाली आहेत़ १० घरांत मोजके कर्मचारी राहतात़ परंतु, या घराची अवस्था दयनीय झाली आहे़कंधार पोलीस ठाण्यात सुमारे ६५ पोलीस कर्मचारी, एपीआय १ व पीएसआय ३ अशी संख्या आहे़ पोलीस निरीक्षक प्रभारी आहेत़ पोलीस ठाण्यातील अपवाद वगळता सर्व पोलीस व अधिकारी भाड्याच्या रुममध्ये वास्तव्य करतात़ पोलीस निरीक्षकाचे निवासस्थानही सोयीसुविधेच्या गर्तेत आहे़ त्यामुळे त्यांनाही भाड्याने रहावे लागत आहे़ सण-उत्सव, जयंती आदींसह सतत शांतता सलोखा कायम राखण्यासाठी पोलीस कर्मचारी अपार परिश्रम घेतात़ परंतु, आपल्याच विभागात घर नसल्याची खंत व्यक्त करतात़ एका वसाहतीत असण्याऐवजी विखुरलेल्या अवस्थेत वास्तव्याला शहरात आहेत़ गत काही वर्षांपासून ४० घरे निकामी झाल्याने अस्वच्छता, मातीचे ढिगारे, झाडे झुडुपे, मोकाट जनावरांचा मुक्तपणे वावर दिसतो़ जुन्या बांधकामाशिवाय नवीन बांधकामात काही कर्मचारी वास्तव्याला आहेत़मागील वर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाने ४ हजार ६२४ चौरस मीटरवर १ कोटी ८५ लाख १३ हजारांचे बांधकाम करण्यासाठीचा प्रस्ताव मंत्रालयात पाठविला होता असे सांगण्यात आले़ जमीनस्तरावर १५७० चौ़मी़, पहिला मजला १३२६ चौ़मी़ व दुसरा मजला १३२६ चौ़मी़ बांधकामातून ७० घरे प्रस्तावित होती़ पोलिसांच्या या घराशिवाय ४०२ चौ़मी़ वर ३ पीएसआयसाठी निवास व्यवस्था आदी त्यात होते़ परंतु प्रस्ताव परत आला़ आणि कर्मचाºयांना घराचे स्वप्न लांबणीवर टाकावे लागले़ आता नवीन प्रस्ताव, मंजुरी, प्रत्यक्ष बांधकाम प्रारंभ व वास्तव्य असा प्रवास कधी होणार? हा प्रश्न आहे़पोलीस कर्मचा-यांसाठी ७० घरे व पीएसआयसाठी तीन अशी १ कोटी ८५ लाख १३ हजार खर्चाची निवासस्थाने बांधण्याचा प्रस्ताव शासनाकडे (नियोजन विभाग) पाठविण्यात आला होता़ तो परत आला आहे़ पुन्हा नव्याने योग्य पद्धतीत प्रस्ताव दोन आठवड्यांत पाठविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत़ नवीन दराप्रमाणे हा प्रस्ताव राहील -ए़एस़ बाळे, उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग, कंधाऱ

 

टॅग्स :NandedनांदेडHomeघरPoliceपोलिस