धर्माबादला बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:20 IST2021-01-19T04:20:29+5:302021-01-19T04:20:29+5:30

शस्त्रक्रिया शिबीर हिमायतनगर - येथील ग्रामीण रुग्णालयात २३ जानेवारी रोजी हॅड्रोसीन, हर्नीयाचे शस्त्रक्रिया शिबीर होणार आहे. शरीरावर कुठलीही गाठ ...

Meeting at Dharmabad | धर्माबादला बैठक

धर्माबादला बैठक

शस्त्रक्रिया शिबीर

हिमायतनगर - येथील ग्रामीण रुग्णालयात २३ जानेवारी रोजी हॅड्रोसीन, हर्नीयाचे शस्त्रक्रिया शिबीर होणार आहे. शरीरावर कुठलीही गाठ असल्यास अशा रुग्णांनी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ.डी.डी. गायकवाड यांनी केले. सदर शस्त्रक्रिया डॉ.लक्ष्मण नाईक करणार आहेत.

जनजागृती अभियान

अर्धापूर - राष्ट्रीय युवा सप्ताहच्या निमित्ताने शंकरराव चव्हाण महाविद्यालय, अर्धापूर रासेयो विभाग व नेहरू युवा केंद्राच्या वतीने वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन, जलसाक्षरता, स्वच्छता, प्लास्टीक मुक्त परिसर आदी उपक्रम राबविण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.के.के. पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून युवा अधिकारी चंदा रावळकर, कुमार कुर्तडीकर, ग्रंथपाल मधुकर बोरसे, कार्यक्रमाधिकारी डॉ.रघुनाथ शेटे, डॉ.के.एल.केंद्रे, रासेयो स्वयंसेवक अमोल सरोदे यांची उपस्थिती होती.

कारची बॅटरी लंपास

लोहा - येथील लोहा-लातूर रोडवर उभ्या असलेल्या कारमधील बॅटरी लांबविण्यात आल्याची घटना १४ व १५ जानेवारी दरम्यान घडली. एम.एच.१६-बी.एच.७९६४ असा कारचा क्रमांक असून बॅटरीची किंमत ६ हजार रुपये होती असे फिर्यादीत नमूद करण्यात आले. लोहा पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली. जमादार बगाडे तपास करीत आहेत.

Web Title: Meeting at Dharmabad