मनपाची सभा अर्ध्या तासांत गुंडाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:14 IST2021-05-28T04:14:55+5:302021-05-28T04:14:55+5:30
महापौर मोहिनी येवनकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सकाळी ११ वाजता ऑनलाईन सभेला सुरुवात झाली. विषयपत्रिकेवरील विषयांना मंजुरी देताना वक्फ बोर्डाकडे ...

मनपाची सभा अर्ध्या तासांत गुंडाळली
महापौर मोहिनी येवनकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सकाळी ११ वाजता ऑनलाईन सभेला सुरुवात झाली. विषयपत्रिकेवरील विषयांना मंजुरी देताना वक्फ बोर्डाकडे ३ एक जागेची मागणी करण्यात आली आहे. खडकपुरा येथील स्मशानभूमी परिसराचा विकास करण्यासाठी ही जागा हस्तांतरित करण्याबाबत ठराव संमत करण्यात आला. त्याचवेळी दिव्यांगांना घरकुल देण्याबाबतचा प्रस्तावही मंजूर केला. ५ टक्के घरकुल दिव्यांगांना देण्याचा शासननिर्णय आहे. त्यानुसार घरकुल दिले जातील, असे प्रशासनाने स्पष्ट केले. या विषयात अस्थिव्यंगांसह कर्णबधिर, अंध व्यक्तींनाही घरकुल द्यावेत, अशी सूचना विरोधी पक्षनेते दीपकसिंह गाडीवाले यांनी केली. शहरातील वसंतनगरसह इतर सखल भागांतील पाणी साचत असल्याचा विषय किशोर स्वामी यांनी सभागृहात मांडला. वेळीच ही कामे करावीत, अशी मागणी त्यांनी केली. दलित वस्ती विषयांवरील चर्चेत बापूराव गजभारे यांनी सूचना केल्या. या सभेतील चर्चेत स्थायी समिती सभापती वीरेंद्रसिंह गाडीवाले यांनीही सूचना केल्या. आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. जवळपास ४० मिनिटांत ही सभा गुंडाळण्यात आली.