पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना पदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:09 IST2021-02-05T06:09:11+5:302021-02-05T06:09:11+5:30
याचबरोबर महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शासकीय आणि खाजगी रुग्णालयांना प्रशस्तीपत्र देऊन ...

पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना पदक
याचबरोबर महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शासकीय आणि खाजगी रुग्णालयांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पुरस्कार देऊन गौरव केला. यात उषा सूर्यवंशी, प्राची गजभारे, मुक्ता नारायण पवार या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय असे पुरस्कार मिळविले. याचबरोबर पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवीतील राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला.
यावेळी परेड कमांडर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे यांच्यासमवेत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी परेडचे निरीक्षण केले व त्यानंतर परेड संचलन झाले. त्यांच्या सोबतीला राखीव पोलीस निरीक्षक शहादेव पोकळे होते.