नामांतर लढ्यातील पहिले शहीद पोचीराम कांबळे असताना १४ जानेवारी रोजी टेंभुर्णी या गावी जाऊन कुणीही अभिवादन करीत नाही. त्यामुळे लाल सेनेने दरवर्षी १४ जानेवारी रोजी टेंभुर्णी येथे जाऊन शहीद पोचीराम आणि वीरपुत्र चंदर कांबळे या शहिदांना अभिवादन करण्याचा संकल्प केला आहे. आंबेडकरी चळवळीतील मातंग समाजाचा बलिदानाचा इतिहास जगासमोर आणून समाजावर होत असलेल्या अन्याय, अत्याचाराचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न या परिषदेतून हाेणार असल्याचे भिसे यांनी सांगितले. परिषदेला ॲड. शिवानंद हैबतपुरे, फारूक अहमद, बाबुराव पोटभरे, सुरेश सदावर्ते, गौतम मुंडे, मारोती वाडेकर, सुरेंद्र घोडजकर, अविनाश घाटे, रामराव गवळी, डॉ. शिवाजी जवळगेकर, शिवा कांबळे, राजेश गायकवाड, गणेश तादलापूरकर, डॉ. के. बी. पाटोळे, संपादक श्याम कांबळे, जयपाल रेड्डी, डॉ. दिलीप अर्जुने, डॉ. संजय सांभाळकर, डॉ. डी. टी. इबितवार, बजरंग ताटे, प्रा. सदाशिव भुयारे, डॉ. मारुती कसाब, राजेश उपाडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अविनाश मोरे, कॉ. ज्ञानेश्वर मोरे, संजय कुंटेवाड, कॉ. अमोल वाघमारे, कॉ. अशोक उबाळे कॉ. हनुमंत खंदारे, कॉ. किशोर कांबळे, यादव कंधारे, विजय मोरताटे आदींनी केले आहे
लाल सेनेची आज मातंग बलिदान परिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:15 IST