मास्कमुळे त्वचेला सुटतेय खाज !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:18 IST2021-07-26T04:18:08+5:302021-07-26T04:18:08+5:30
नाक आणि तोंडाला हवा लागू नये या पद्धतीचा मास्क असावा. घट्ट मास्क वापरू नये, त्यापासून श्वसनाचा त्रास होतो. एन ...

मास्कमुळे त्वचेला सुटतेय खाज !
नाक आणि तोंडाला हवा लागू नये या पद्धतीचा मास्क असावा. घट्ट मास्क वापरू नये, त्यापासून श्वसनाचा त्रास होतो.
एन ९५ किंवा कपड्यांचाही मास्क वापरू शकता. कपड्याचा मास्क नियमितपणे डेटाॅलमध्ये धुवून वापरावा.
कोरोना काळात मास्कचा अतिरेकी वापरामुळे नाक आणि तोंडाच्या त्वचेला आजार होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात नकावर लाली येणे, सुज येणे असे प्रकार आहेत. - डाॅ.विनोद चव्हाण
गर्दीच्या ठिकाणी जातानाच मास्क वापरावा, त्यात तो सुती कपड्याचा तयार केलेला असेल तर उत्तम, त्यापासून कोणताही त्रास होणार नाही व संरक्षणही हाेईल. - डाॅ. शिवानंद बासरे, नांदेड.
सॅनिटायझर
पेक्षा साबण बरे
सॅनिटायझरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण असते. त्यामुळे हाताचे कातडे जात आहेत.
कोणत्याही पद्धतीने हात स्वच्छ धुणे गरजेचे आहे. त्यासाठी साबण वापरू शकता
साबण, हॅण्डवाॅशचा वापर करून हात स्वच्छ करूनही सुरक्षित राहू शकता.