विवाहितेवर बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 23:43 IST2018-03-05T23:43:23+5:302018-03-05T23:43:51+5:30
शेतामध्ये जनावरांना चारा टाकत असताना विवाहितेवर बलात्कार केल्याची घटना डोरली (ता. हदगाव) येथे रविवारी घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच आरोपी पसार झाला.

विवाहितेवर बलात्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
हदगाव : शेतामध्ये जनावरांना चारा टाकत असताना विवाहितेवर बलात्कार केल्याची घटना डोरली (ता. हदगाव) येथे रविवारी घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच आरोपी पसार झाला.
सदर विवाहिता नेहमीप्रमाणे सकाळी घरातील कामकाज आटोपून ती स्वत:च्या शेतामध्ये एक म्हैस व बैलजोडी घेऊन गेली असता शेतामधील मका पीक कापून जनावरांना टाकत असताना आरोपी मारोती लोहाटे याने पीडितेचा हात धरुन तिला कापसाच्या शेतात तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे.
पीडित महिलेने हदगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला. उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय वाळके तपास करीत आहेत. पीडितेला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.