Video: 'पोलीस भरती घ्या', जोरदार घोषणाबाजीनंतर देवेंद्र फडणवीस तरुणांकडे आले, पण...
By शिवराज बिचेवार | Updated: September 17, 2022 12:15 IST2022-09-17T12:10:54+5:302022-09-17T12:15:54+5:30
Marathwada Muktisangram Din:देवेंद्र फडणवीस पोहचताच तरुणांनी पोलीस भरती झालीच पाहिजे, अशा घोषणा सुरू केल्या. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.

Video: 'पोलीस भरती घ्या', जोरदार घोषणाबाजीनंतर देवेंद्र फडणवीस तरुणांकडे आले, पण...
नांदेड- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी ध्वजारोहण करण्यासाठी आलेले उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर तरुणांनी पोलीस भरती घ्या, अशी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. (Marathwada Muktisangram Din)
माता गुजरिजी विसावा उद्यान या ठिकाणी मुख्य शासकीय ध्वजारोहण केल्यानंतर फडणवीस श्रीनगर भागात एका कार्यक्रमासाठी गेले होते. यावेळी रस्त्याच्या दोन्ही कडेला हजारो तरुण थांबले होते. फडणवीस पोहचताच तरुणांनी पोलीस भरती झालीच पाहिजे, अशा घोषणा सुरू केल्या. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. फडणवीस यांनी तरुणांचे निवेदन घेतले पण त्यांना काही न बोलतच ते निघत होते. त्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाले. धक्काबुक्की ही सुरू झाली. पोलिसांनी सौम्य लाठीमार करीत गर्दीला पांगविले.
VIDEO: नांदेडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रम स्थळी विद्यार्थ्यांचा गोंधळ, 'पोलीस भरती झाली पाहिजे'च्या दिल्या घोषणा pic.twitter.com/InUa7D5p4F
— Lokmat (@lokmat) September 17, 2022