शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
2
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
3
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
4
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
5
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
6
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
7
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
8
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
9
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
10
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
11
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
12
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
13
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
14
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
15
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
16
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
17
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
18
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
19
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
20
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ

मालेगाव ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव अडगळीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 00:23 IST

अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथे ७ वर्षापूर्वी दीड कोटी रुपये खर्च करुन उभारण्यात आलेले ट्रामा युनिट केअर सेंटर ग्रामीण रुग्णालय संलग्नीत नसल्यामुळे धुळखात पडले आहे. प्रशासनाच्या दप्तरदिरंगाईमुळे ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव अडगळीला पडला आहे.

ठळक मुद्देतब्बल सात वर्षांपासून दीड कोटी रुपयांचे ट्रामा केअर युनिट धुळखात

शरद वाघमारे।लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथे ७ वर्षापूर्वी दीड कोटी रुपये खर्च करुन उभारण्यात आलेले ट्रामा युनिट केअर सेंटर ग्रामीण रुग्णालय संलग्नीत नसल्यामुळे धुळखात पडले आहे. प्रशासनाच्या दप्तरदिरंगाईमुळे ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव अडगळीला पडला आहे.जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ट्रामा केअर सेंटर सुरू करण्यासाठी पालकमंत्री यांनी निधी देवून ट्रामा केअर सुरू करण्याची मागणी जि.प. सदस्य नागोराव इंगोले यांनी केली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी २००९ मध्ये मालेगाव येथे ट्रामा युनिट केअर सेंदटर सुरू करण्यासाठी मंजुरी दिली होती. त्यासाठी डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांची ९ पदेही मंजूर करण्यात आली होती. परंतु सदरील ट्रामा केअर सेंटर सुरू करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय सलंग्नित असावेत, अशी तांत्रिक अडचण समोर आली आहे. ३० खाटाचे ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यासाठी साडेपाच कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे.यासाठी एकूण २५ डॉक्टर व कर्मचारी यांचा प्रस्ताव जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्फंत आरोग्य, उपसंचालक लातूर याच्याकडे पाठविण्यात आला आहे. परंतु उपसंचालक कार्यालयाकडून अद्यापही सदरील प्रस्ताव मंत्रालयाकडे पाठविण्यात आला नाही. माजी जि.प. सदस्य नागोराव इंगोले यांनी सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत यांच्याकडे ट्रामा केअर सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. मालेगाव येथून कल्याण-निर्मल हा २२२ क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग असून या महामार्गाावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते.अपघातग्रस्तांना उपचारासाठी ट्रामा नसल्याने जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे मालेगाव येथील ट्रामा केअर युनिट सेंटर सुरू होणे अत्यंत आवश्यक आहे. ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यासाठी मुख्य इमारतीसाठी २ कोटी रुपये डॉक्टरांच्या निवासस्थानासाठी २ कोटी, यंत्र सामुग्रीसाठी १७.५० लाख इतर अनावरचे खर्च ८३ लाख होते. असा एकूण पाच कोटी ८ लाख ३६ हजारांचा खर्च ग्रामीण रुग्णालय उभारणीसाठी प्रस्तावित केलेला आहे. परंतु लातूर येथील आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून एक वर्षापासून हा प्रस्ताव मान्यतेसाठी आरोग्य विभागाकडे पाठविला नाही. प्रशासकीय व तांत्रिक बाबीची मान्यता निधी तरतूद याबाबीमुळे मालेगाव येथील ग्रामीण रुग्णालय मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत.दुसरीकडे सात वर्षापूर्वी दीड कोटी रुपये खर्च करुन बांधण्यात आलेले ट्रामा केअर युनिट सेंटर धुळखात पडले आहे. पालकमंत्री रामदास कदम यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ग्रामीण रुग्णालयासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी माजी नागोराव इंगोले यांनी केली़नऊ पदांना दिली होती मंजूरीमालेगाव येथे ७ वर्षापूर्वी ट्रामा युनिट केअर सेंटरला मान्यता मिळाली. त्यासाठी ९ पदांना मंजुरी देण्यात आली. त्यात अस्थीव्यंग, शल्य चिकित्सक-वर्ग-२- १ पद, बधिरीकरण शास्त्रज्ञ वर्ग-२ दोन पदे, वैद्यकीय अधिकारी-२, परिसेविका वर्ग-३ १ पद, अधिपरिचारिक-३ असे एकूण ९ पदांना मंजुरी देण्यात आली आहे. सद्य:स्थितीत या पदावरील डॉक्टर, कर्मचाऱ्यांची नियुक्ती मालेगाव येथील ट्रामा केअर सेंटर युनिटला असताना काम मात्र दुस-या दवाखान्यात करत आहेत. एकीकडे पदस्थाना असूनही ट्रामा युनिट केंद्र मात्र बंद अवस्थेत आहे.

सात वर्षापूर्वी मालेगाव येथे ट्रामा युनिट केअर सेंटर उभारण्यात आली आहे. परंतु ग्रामीण रुग्णालय संलग्नीत नसल्यामुळे सदरील ट्रामा सेंटर सुरू होत नाही. ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव आरोग्य मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करुन आरोग्य विभागाकडे पाठवण्यात आला आहे. दप्तर दिरंगाईमुळे तो तसाच पडून आहे. पालकमंत्री यांच्याकडे निधीसाधी मागणी करणार आहे. - नागोराव इंगोले, माजी जि.प. सदस्य, मालेगाव.

टॅग्स :NandedनांदेडHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल