शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांना यूपीएचा अध्यक्ष करणे हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे व्यक्तिगत मत असू शकते : नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 12:53 IST

सध्या यूपीएच्या विद्यमान अध्यक्ष सोनिया गांधी आहेत. यूपीएच्या सर्व घटक पक्षांनी एकत्र येऊन त्यांची निवड केली आहे.

नांदेड - शरद पवारांना (Sharad Pawar) यूपीएचा (UPA) अध्यक्ष करणे हे त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचे व्यक्तिगत मत असू शकते, त्यामुळे यावर आताच काही चर्चा करण्याचे कारण नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली. ( Nana Patole on Sharad Pawar and UPA leadership) 

भाजपाला थोपवण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याची भावना व्यक्त केली जात असताना मंगळवारी दिल्लीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत महत्वाचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. देशातील सध्याच्या कठीण राजकीय परिस्थितीत शरद पवार यांनीच काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्षांचे एकत्रित नेतृत्व करावे, असा प्रस्ताव राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख यांनी बैठकीत मांडला. विशेष म्हणजे या बैठकीला स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील उपस्थित होते. 

यावेळी सर्वानुमते शरद पवारांनी युपीएचे नेतृत्व करावं यासाठीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यावरून राजकीय क्षेत्रात चर्चा सुरु झाली आहे. या ठरावावर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जास्त बोलण्याचे टाळत मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. नाना पटोले हे मंगळवारी सायंकाळी नांदेड विमानतळावर आले होते. यावेळी त्यांनी शरद पवारांना यूपीएचा अध्यक्ष होण्याबाबत शुभेच्छा असतील काय, हा प्रश्न विचारला असता त्यांनी अधिक बोलण्याचे टाळत, हे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचे व्यक्तिगत मत असू शकते अशी प्रतिक्रिया दिली. 

हा नवीन विषय नाही : अशोक चव्हाण दरम्यान, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण ( Ashok Chavhan ) यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. चव्हाण म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसने यूपीएचा अध्यक्ष कोणाला करावे, हे त्यांचे व्यक्तिगत मत असू शकते. परंतु सध्या यूपीएच्या विद्यमान अध्यक्ष सोनिया गांधी ( Sonia Gandhi) आहेत. यूपीएच्या सर्व घटक पक्षांनी एकत्र येऊन त्यांची निवड केली आहे. त्यामुळे हा काही नवीन विषय नाही. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याबद्दल आम्हाला आदरच आहे. परंतु यूपीए अध्यक्ष पदाचा विषय सर्व घटक पक्षांनी ठरविला असल्यामुळे त्यावर अधिक बोलणे उचित नाही, अशी प्रतिक्रिया दिली.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेAshok Chavanअशोक चव्हाणSharad Pawarशरद पवारSonia Gandhiसोनिया गांधीBJPभाजपा