माहूर (जि. नांदेड): महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहूर गडावर श्री रेणुका देवीच्या चैत्र नवरात्र महोत्सवास गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. गुरुवारी (१९ मार्च) दुपारी साडेबारा वाजता विधिवत घटस्थापना करून देवीची महाआरती करण्यात आली. यानिमित्त संपूर्ण गड परिसर 'आई राजा उदे उदे'च्या जयघोषाने दणाणून गेला आहे.
सनईच्या सुरात महापूजाउत्सवाच्या पहिल्या दिवशी पहाटे ६ वाजता प्रसिद्ध सनई वादक नितीन धुमाळ आणि संचाच्या सनई वादनाने महोत्सवाची सुरुवात झाली. पुजारी भवानीदास भोपी, शुभम भोपी आणि समीर भोपी यांच्या हस्ते देवीला पंचामृत अभिषेक करून पिवळ्या रंगाचे पैठणी महावस्त्र आणि सुवर्णालंकार परिधान करण्यात आले. मुख्य गाभाऱ्यासह परिसरातील तुळजाभवानी, परशुराम आणि महालक्ष्मी मंदिरातही पारंपरिक पद्धतीने सप्तधान्यांची पेरणी करून पहिली माळ चढवण्यात आली.
मराठी नववर्षाचा उत्साहमराठी नववर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्यासाठी महाराष्ट्र, विदर्भ आणि शेजारील आंध्र प्रदेशातून हजारो भाविकांनी गडावर गर्दी केली आहे. मंदिर विश्वस्तांच्या हस्ते निशाण चढवून गुढीची विधिवत पूजा करण्यात आली. महाआरतीनंतर कुमारिका आणि सुवासिनींचे पूजन करण्यात आले. पुढील नऊ दिवस हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार असून, गडावर भक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Web Summary : Chaitra Navratri festivities commenced at Mahur Gad's Renuka Devi temple with traditional rituals. Thousands of devotees from Maharashtra and neighboring states thronged the temple on Gudi Padwa, marking the Marathi New Year, creating a devotional atmosphere during the nine-day celebration.
Web Summary : माहूर गढ़ के रेणुका देवी मंदिर में चैत्र नवरात्रि उत्सव पारंपरिक रीति-रिवाजों के साथ शुरू हुआ। गुड़ी पड़वा पर महाराष्ट्र और पड़ोसी राज्यों से हजारों भक्त मंदिर में उमड़े, मराठी नव वर्ष मनाया, जिससे नौ दिवसीय उत्सव के दौरान भक्तिमय वातावरण बना।