Maharashtra Election 2019 : बंड झाले थंड ! चिखलीकरांपाठोपाठ खतगावकरही नरमले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 05:56 PM2019-10-03T17:56:08+5:302019-10-03T18:01:22+5:30

दोघांकडून मुख्यमंत्री सांगतील तोच निर्णय घेतला जाईल असे सांगत नरमाईची भूमिका

Maharashtra Election 2019: Rebellion cools down! Bhaskar Patil Khatgaonkar also softened after Pratap Patil Chikhali | Maharashtra Election 2019 : बंड झाले थंड ! चिखलीकरांपाठोपाठ खतगावकरही नरमले

Maharashtra Election 2019 : बंड झाले थंड ! चिखलीकरांपाठोपाठ खतगावकरही नरमले

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यात भाजपाला दोनच जागाचिंतनासाठी मागितला वेळ

नांदेड : लोहा मतदारसंघ शिवसेनेला सुटल्यानंतर समर्थकांनी बंडाचा झेंडा फडकावल्यानंतर खा.चिखलीकरांनी मुख्यमंत्री सांगतील तोच निर्णय घेतला जाईल असे सांगत नरमाईची भूमिका घेतली होती़ चिखलीकरांपाठोपाठ आता भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर यांनीही चिंतनासाठी वेळ मागत बंडाचा झेंडा खाली ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे़

सेना-भाजपाच्या युतीमध्ये विद्यमान खा़प्रताप पाटील चिखलीकर यांचे पूत्र प्रवीण पाटील चिखलीकर हे भाजपामधून विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक होते़ मात्र लोह्याची जागा सेनेला सुटली़ तर नायगाव विधानसभा मतदारसंघातून प्रदेश उपाध्यक्ष खतगावकर यांची सून डॉ़मिनल पाटील खतगावकर यांनी विधानसभेसाठी तयारी केली होती़ नायगावची जागाही मित्रपक्ष रिपाइंला सोडून तेथे राजेश पवार यांना उमेदवारी देण्यात आली़ या प्रकारामुळे विद्यमान खा़प्रताप पाटील चिखलीकर आणि माजी खाख़तगावकर यांच्या समर्थकांनी लोहा आणि नायगाव मतदारसंघात वेगळी भूमिका घेण्याची मागणी केली होती़ मंगळवारी झालेल्या बैठकीत चिखलीकरांनी समर्थकांपुढे गुरुवारपर्यंतची वेळ मागितली होती़ तर खतगावकरांच्या राजेंद्रनगर येथील निवासस्थानी गुरुवारी झालेल्या बैठकीत खतगावकरांनी समर्थकांपुढे शुक्रवारी सकाळपर्यंतची वेळ चिंतनासाठी मागितली आहे़ 

राजेंद्रनगर येथे झालेल्या बैठकीत गुरुवारी खतगावकर समर्थकांनी डॉ़मिनलताई पाटील यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला़ तुम्ही सांगाल तो निर्णय मान्य राहील असेही कार्यकर्त्यांनी भावनाविवश होत सांगितले़ यावेळी व्यंकट पाटील गुजरीकर, शेख वल्ली, मंगल देसाई, खालयाअप्पा कासराळीकर, जीवन चव्हाण, भगवानराव मनूरकर, धनराज शिरोळे, सुभाष खांडरे, धोंडीबा कांबळे, सरजीतसिंघ गील, नामदेव पाटील जाहूरकर, यादवराव तुडमे आदी कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या़ या सहविचार सभेत बोलताना डॉ़मिनलताई खतगावकर यांनी पक्षाकडे खतगावकरांनी आपल्या तिकीटाची मागणीही सून म्हणून नव्हे तर हे काम करणारी कार्यकर्ती म्हणून मागितले होते़ पक्षाने कामाची दखल घेतली नसली तरीही आपण पक्षकार्य सुरूच ठेवू असे त्यांनी स्पष्ट केले़ त्यानंतर खतगावकर यांनी कार्यकर्त्यांपुढे जिल्ह्यात आपण भाजपाला ताकद दिल्याचे सांगताना आम्ही काही संन्यासी नाहीत, आम्हालाही कार्यकर्त्याची चिंता आहे़ पण त्याच वेळी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात चांगले काम होत असल्याचे सांगत त्यांनी कोणताही निर्णय हा विचारपूर्वक घेवू असे सांगून शुक्रवारी सकाळपर्यंत चिंतनासाठी वेळ मागितली़ 

या बैठकीनंतर माजी खाख़तगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना प्रत्येक पक्षात उमेदवारीसाठी स्पर्धा असते, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर असंतोष असतो असे सांगितले़ भाजपा हा कुटुंबियांना तिकीट देत नसल्याचे सांगितले़ 

जिल्ह्यात भाजपाला दोनच जागा
लोकसभा निवडणुकीत मोठा विजय प्राप्त करणाऱ्या भाजपाला जिल्ह्यात केवळ दोनच जागा मिळाल्या आहेत़ यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत़ किमान पाच जागा तरी मिळाव्यात अशी अपेक्षा होती़ पण ती पूर्ण झाली नाही़ याबाबत निश्चितच विचार करण्याची गरज असल्याचेही खतगावकर म्हणाले़ काँग्रेससोबत काही चर्चा झाली काय, या प्रश्नावर त्यांनी सर्व गोष्टी सांगायच्या नसतात, असे उत्तर दिले़ 

Web Title: Maharashtra Election 2019: Rebellion cools down! Bhaskar Patil Khatgaonkar also softened after Pratap Patil Chikhali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.