शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

'मतदानाला गावाकडे या'; उमेदवारांकडून स्थलांतरीत मतदारांचा शोध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 19:27 IST

प्रचार अंतिम टप्प्यात येताच मतदारांचा शोध सुरु

ठळक मुद्देखरिप हंगाम संपताच हजारो कुटुंबांचे मतदारसंघातून स्थलांतरण रोजगारासाठी पुणे, मुंबई तसेच हैद्राबाद येथे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर बाहेरगावातील मतदारांना एकत्रित करुन आणण्याची व्यवस्थाही केली जात आहे.

- अनुराग पोवळे 

नांदेड : एकीकडे रोजगाराचे प्रचारात आश्वासन  देत असलेल्या प्रमुख उमेदवारांकडून आता रोजगारासाठीच स्थलांतरीत झालेल्या मतदारांचा शोध घेण्याचे काम सुरू झाले आहे. या मतदारांना मतदानासाठी आणायचे नियोजनही केले जात आहे.

जिल्ह्यात असलेल्या नऊ मतदारसंघातील  सर्वाधिक स्थलांतर मुखेड, कंधार, लोहा, नायगांव या तालुक्यातून होत असल्याने या मतदारसंघात स्थलांतरीत  मतदारांचा शोध सुरू आहे.  नायगाव मतदारसंघातील नायगावसह सीमावर्ती भागातील उमरी आणि धर्माबाद तालुक्यातून रोजगारासाठी जवळच्या तेलंगणा राज्यात स्थलांतरीत होत आहेत. नायगाव मतदारसंघात एकूण मतदारांची संख्या १ लाख ३६ हजार ४०८ इतकी आहे. या मतदारसंघातून स्थलांतरणाचे प्रमाण मोठे आहे. सर्वाधिक चिंताजनक परिस्थिती मुखेड मतदारसंघात आहे. या मतदारसंघात रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सिंचनाची व्यवस्था नसल्याने खरिप हंगाम संपताच हजारो कुटुंब या मतदारसंघातून स्थलांतरण करीत असतात. याच मतदारसंघात समाविष्ट असलेल्या कंधारच्या काही भागातूनही रोजगारासाठी पुणे, मुंबई तसेच हैद्राबाद येथे स्थलांतर होते. या मतदारसंघात १ लाख ३४ हजार १६९ मतदार आहेत. 

मुखेड मतदारसंघालगत असलेल्या लोहा मतदारसंघातही स्थलांतरणाचे प्रमाण मोठे आहे. डोंगराळ भाग, रोजगाराची कोणतेही साधन नसल्याने येथे कुटुंबासह आता युवकांनाही मोठ्या प्रमाणात स्थलांतर करावे लागत आहे. या मतदारसंघातून मोठ्या संख्येने रोजगारासाठी पुणे, मुंबईसह नाशिक आदी महानगरात स्थलांतर होत आहे. लोहा मतदारसंघात २ लाख ७३ हजार २२२ मतदार आहेत. या मतदारांना उमेदवार रोजगाराचे आश्वासन देत आहेत.  याच स्थलांतरीत मतदारांचा शोध प्रमुख उमेदवारांकडून घेतला जात आहे. मतदार यातील नावे शोधताना तो मतदार गावात नसल्याचे लक्षात येताच त्याचा ठाव ठिकाणा शोधला जात आहे. त्याच्याशी संपर्क करुन मतदानाच्या दिवशी गावाकडे ये, असा निरोप दिला जात आहे. इतकेच नव्हे तर बाहेरगावातील मतदारांना एकत्रित करुन त्यांना आता आणण्याची व्यवस्थाही केली जात आहे.  एकूणच स्थलांतरीत मतदारांची विनवणी आता उमेदवारांकडून सुरू आहे. 

जिल्ह्यात कोणतेही मोठे उद्योगधंदे नसल्याने स्थलांतरणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. आहे ते कारखानेही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. जिल्ह्यात बंद पडलेल्या कारखान्यांचीही मोठी संख्या आहे. उस्मानशाही मील, टेक्सकॉम उद्योग, सुत गिरण्या बंद अवस्थेत असल्याने रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बहुतांश उमेदवारांनी रोजगाराचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन प्रचारात दिले आहे. दर निवडणुकीत असेच आश्वासने दिले जात असतात. जे की कधीही पूर्ण झाले नाहीत.

लोहा मतदारसंघाचा प्रचार पुण्यातलोहा मतदारसंघातील अनेक युवक हे रोजगारासाठी पुण्यामध्ये स्थलांतरीत झाले आहेत. हीच बाब लक्षात घेवून मतदारसंघातील एका उमेदवाराने चक्क पुणे येथेच या स्थलांतरीत मतदारांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात पुन्हा एकदा मतदारसंघात रोजगार निर्मितीचे आश्वासन देण्यात आले. जिल्ह्यात पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांची संख्या ही ६३ हजार ५६२ इतकी आहे. विशेष म्हणजे यातील ७० टक्के मतदार हे सुशिक्षित असले तरीही इतर मतदार हे  या ना त्या कारणाने मतदारसंघाबाहेर स्थलांतरीत झाले आहे. त्यात रोजगाराचे मुख्य कारण आहे. स्थलांतरीत मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी आता आवश्यक ती वाहन व्यवस्था उमेदवारांकडून केली जात आहे. मतदारांची संख्या पाहून वाहन निश्चित केले जात आहे. त्याचवेळी काही उमेदवार मतदारांना आपण स्वत:हून यावे. आल्यानंतर जो काही खर्च झाला तो दिला जाईल, असे आश्वासनही दिले जात आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nandedनांदेडloha-acलोहाmukhed-acमुखेड