शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

Maharashtra Bandh : नांदेडनजीक तिरूपती एक्स्प्रेसवर दगडफेक; विभागातील ११ रेल्वेगाड्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 16:22 IST

महाराष्ट्र बंदचा परिणाम मराठवाड्यातील रेल्वे सेवेवर झाला असून चुडावा, पूर्णा, वाशिम, हिंगोली, जालना आदी ठिकाणी रेलरोको करण्यात आल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली.

नांदेड : महाराष्ट्र बंदचा परिणाम मराठवाड्यातील रेल्वे सेवेवर झाला असून चुडावा, पूर्णा, वाशिम, हिंगोली, जालना आदी ठिकाणी रेलरोको करण्यात आल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. नांदेडपासून नजिक असलेल्या चुडावा परिसरातील गेट क्रमांक १३४ जवळ अज्ञात व्यक्तींनी तिरूपती एक्स्प्रेसवर दगडफेक केली़ परिणामी नांदेड विभागातून धावणाऱ्या जवळपास ११ गाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे़ 

मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने ९ आॅगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती़ त्यानूसार राष्ट्रीय, राज्य मार्गासह नांदेड जिल्ह्यात जिल्हा मार्गदेखील बंद करण्यात आले़ रास्कारोकोमुळे सर्वत्र वाहनांच्या रांगा लागल्या आहेत़ त्यातच चुडावा परिसरात अमरावती - तिरुपती एक्स्प्रेसवर अज्ञातांनी दगडफेक केली़ त्यामुळे ही गाडी चुडावा-नांदेड दरम्यान जवळपास दिड तास थांविण्यात आली. विभागात ठिकठिकाणी झालेल्या रेलरोकोमुळे रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे़ नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेस चुडावा-पूर्णा दरम्यान तीन तास तर नगरसोल-नरसापूर एक्स्प्रेस आणि अमृतसर-नांदेड सचखंड एक्स्प्रेस या दोन्ही गाड्या औरंगाबाद स्थानकावर थांबवून ठेवल्या आहेत़  

पाच गाड्या रद्द, सहा अंशत: रद्दनांदेड विभागातील परिस्थिती लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून तत्काळ पाच गाड्या रद्द तर सहा गाड्या अंशत: रद्द केल्या आहेत़ यामध्ये  गाडी संख्या ५७५४०  परळी - अकोला, गाडी संख्या ५७५८३ अकोला-पूर्णा आणि गाडी संख्या ५७५१२ परभणी-नांदेड, गाडी संख्या ५७५५२ आदिलाबाद-पूर्णा, गाडी संख्या ५७५३९ अकोला-परळी या पाच सवारी गाड्या ९ आॅगस्ट रोजी पूर्णत: रद्द करण्यात आल्या आहेत़ तर गाडी संख्या ५७५५४ आदिलाबाद-परळी सवारी गाडी गुरूवारी पूर्णा-परळी दरम्यान रद्द केली़ गाडी संख्या ५७५४१ नगरसोल-नांदेड सवारी गाडी परभणी ते नांदेड दरम्यान रद्द, गाडी संख्या ५७५६२ मनमाड-काचीगुडा सवारी गाडी परभणी ते काचीगुडा दरम्यान रद्द करण्यात आली आहे़

दरम्यान, काचीगुडा गाडीचा रेक गाडी संख्या ५७५६१ बनून परभणी-मनमाड अशी धावेल. त्याचबरोबर गाडी संख्या ५७५६१ काचीगुडा-मनमाड सवारी गाडी ९ रोजी नांदेड-मनमाड दरम्यान रद्द करण्यात आली़ या गाडीचा रेक गाडी संख्या ५७५६२ बनून नांदेड-काचीगुडा अशी धावेल.  दरम्यान, नांदेड विभागातून सोडण्यात येणाऱ्या इतर गाड्या वेळेवर धावाव्यात तसेच रेलरोकोमुळे होणारा परिणाम यावर नांदेड विभागातील अधिकारी लक्ष ठेवून आहेत़ रेल्वे ही राष्ट्रीय संपत्ती असून सर्वांनी संयम बाळगावा, नुकसान करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंद