शहरातील नाथनगर येथे संस्थाचालक बालाजी प्रल्हादराव पावडे याने संतोष भारत शिवशक्ती रा.काळनूर ता.जळकोट याला बोलावून घेतले. किनवट तालुक्यातील घोटीच्या निवासी मतिमंद विद्यालयात विशेष शिक्षक पदाची नोकरी लावतो म्हणून शिवशक्ती यांच्याकडून १२ लाख रुपये घेतले. त्यानंतर २०१४ ते २०१६ या काळात पैसे घेतल्यानंतरही शिक्षक म्हणून काम करावयास लावले. त्यानंतर शिवशक्ती यांनी दिलेली रक्कम परत मागितली. परंतु आरोपीकडून टाळाटाळ करण्यात येत होती. एक तर नोकरी द्या नाही तर पैसे परत द्या म्हणून शिवशक्ती याने तगादा लावला होता. त्यानंतर आरोपी पावडे याने शिवशक्ती यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणात आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शिवशक्ती यांच्या तक्रारीवरुन विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोउपनि देवके हे करीत आहेत.
शिक्षकाच्या नोकरीचे आमिष दाखवून गंडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:31 IST