गावांना आत्मियतेने बघा, गावे बदलतील : उपायुक्त सुरेश बेदमुथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:31 IST2021-02-06T04:31:13+5:302021-02-06T04:31:13+5:30
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ...

गावांना आत्मियतेने बघा, गावे बदलतील : उपायुक्त सुरेश बेदमुथा
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, डी. यू. इंगोले, एस. व्ही. शिंगणे, व्ही. आर. पाटील, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे आदींची यावेळी उपस्थिती होती. लोकांचे परिवर्तन करून केलेले काम हे चिरकाल टिकणारे असते. या परिवर्तनातूनच गावाची ओळख निर्माण होत असते. त्यासाठी गावात मूलभूत सुविधांसह कायम स्वच्छतेचा उपक्रम हाती घेऊन लोकांचे आरोग्यमान उंचावावे. त्यासाठी नकारात्मक भावना बाजुला ठेवून कामे करावीत. माझा गाव सुंदर गाव ही संकल्पना साकारतांना गावातील शाळा, अंगणवाड्या, ग्रामपंचायत व इतर कार्यालयांची रंगरंगोटी करुन गावात नियमित स्वच्छता ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी बेथमुथा यांनी माझा गाव सुंदर गाव करण्यासाठी उपस्थितांना शपथ दिली. डॉ. शरद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. बालाजी नागमवाड यांनी सूत्रसंचालन केले. शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी आभार मानले.
चौकट............
माझा गाव सुंदर गाव ही एक चळवळ झाली पाहिजे : वर्षा ठाकूर
माझा गाव सुंदर गाव हे अभियान स्वरुपात न राबविता ती एक चळवळ झाली पाहिजे. या चळवळीत लोकांचा सहभाग घेऊन नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्यास गावात मोठ्या प्रमाणात बदल दिसून येतील, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. ग्रामसेवक हा ग्राम विकासाचा कणा असून, त्यांनी गावातल्या अडचणी समजून कामे करावीत. नाले सफाई, गाव स्वच्छता, शौचालयाचा नियमित वापर, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासह स्थानिक कार्यालयांची रंगरंगोटी करावी. ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड पूर्ण ठेवावे, असेही त्या म्हणाल्या.