शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
4
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
5
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
6
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
7
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
8
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
9
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
10
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
11
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
12
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
13
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
14
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
15
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
16
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
17
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
18
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
19
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
20
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले

Lok Sabha Election 2019 : लिंगायतांना अल्पसंख्यांकाचा दर्जा देण्याची काँग्रेसची लेखी ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 18:44 IST

राज्य समन्वय समितीने दिला काँग्रेसला पाठिंबा

नांदेड : लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता व राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्यांक दर्जा देण्याची लेखी ग्वाही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़अशोकराव चव्हाण यांनी दिली़ त्यानंतर लिंगायत समन्वय समितीने राज्यभरात काँग्रेसच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला असून त्याची घोषणा गुरुवारी नांदेड येथे पत्रकार परिषदेत करण्यात आली़ 

या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़अशोकराव चव्हाण यांच्यासह लिंगायत समन्वय समितीचे राष्ट्रीय समन्वयक अविनाश भोसीकर, राज्य समन्वयक माधवराव पाटील टाकळीकर, प्रदीप बुरांडे, विजयकुमार दत्तुरे, आनंद कर्णे, राजेश विभुते यांच्यासह लिंगायत समाजातील अनेकांची उपस्थिती होती़ लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता व राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्यांक दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, केरळ यासह इतर राज्यात लिंगायत समाजाच्या वतीने अनेक मोर्चे काढण्यात आले होते

या मागणीला प्रतिसाद देत कर्नाटक राज्य काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री  सिद्धरामय्या सरकारने लिंगायत धर्माचे स्वतंत्र अस्तित्व मान्य करून केंद्र सरकारला संविधानिक मान्यतेसाठी प्रस्ताव पाठवला़ तसेच राज्यात अल्पसंख्यांक दर्जा लागू केला़ परंतु केंद्रातील भाजपा सरकारने लिंगायत समाजाच्या मागण्यांबाबत अभ्यास न करता तो अहवाल फेटाळून लावला़ कर्नाटक राज्याच्या धर्तीवर लिंगायत स्वतंत्र मान्यतेचा प्रस्ताव केंद्रात पाठवून राज्यात लिंगायतांना अल्पसंख्यांक दर्जा देण्याचे लेखी आश्वासन प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी दिले आहे़ त्यामुळे लिंगायत समाजाने संपूर्ण ताकदीनिशी राज्यात काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे़ अशी भूमिका लिंगायत समन्वय समितीने स्पष्ट केली़ 

यावेळी हरीहरराव भोसीकर, बालाजी पांडागळे, माजी सभापती किशोर स्वामी, प्रवक्ता संतोष पांडागळे, नगरसेवक राजू काळे, केशवअप्पा खिचडे, नामदेव पटणे, विनोद कांचनगिरे, प्रा़रविकांत काळे, प्रा़माधव मोरे, पिंटूअप्पा बोंबले, शंकरस्वामी शेवडीकर, दिलीप डांगे, सचिन टाले, रत्नाकर कुºहाडे, संदीप विश्वासराव, मनोज लंगडे, विश्वनाथ दासे, वीरभद्र विभुते, धनंजय घोडके, किशोर बारसे आदींची उपस्थिती होती़ 

महापुरुषांच्या स्मारकावरून भाजपाचे राजकारण देशात महापुरुषांच्या राष्ट्रीय स्मारकांचे भाजपा सरकार राजकारण करीत आहे़ एकाही महापुरुषाच्या राष्ट्रीय स्मारकाचे काम या सरकारच्या मागील साडेचार वर्षाच्या कार्यकाळात पूर्ण झाले नाही़ त्यामुळे अशा विश्वासघातकी सरकारच्या विरोधात आंदोलने सुरू आहेत़ नांदेड शहरात उभारण्यात येत असलेल्या महात्मा बसवेश्वर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून लिंगायत समाज एकजुटीने काँग्रेसच्या पाठीशी असल्याचेही अशोकराव चव्हाण यावेळी म्हणाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnanded-pcनांदेडMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019reservationआरक्षण