लॉकडाऊनमध्ये काढली मिरवणूक; नांदेडमध्ये भाविक आणि पोलिस आले आमनेसामने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 20:18 IST2021-03-29T20:06:22+5:302021-03-29T20:18:28+5:30
Lockdwon In Nanded : सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी तणावपूर्ण वातावरण आहे.

लॉकडाऊनमध्ये काढली मिरवणूक; नांदेडमध्ये भाविक आणि पोलिस आले आमनेसामने
नांदेड : नांदेडमध्ये लॉकडाऊन असल्याने होळीनंतर निघणाऱ्या शिख समाजाच्या हल्लाबोल मिरवणुकीला परवानगी नव्हती. मात्र, सोमवारी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास भाविक गुरुद्वारामध्ये मोठ्या प्रमाणात जमा झाले. यावेळी मिरवणुकीस प्रतिबंध करण्यासाठी गुरुद्वारा चौरस्त्यावर पोलीस तैनात होते. चौरस्त्यावर बैरिकेटिंग करण्यात आली होती. या दरम्यान पोलीसांशी हुज्जत घालून काही लोकांनी बैरिकेटिंग तोडली. त्यामुळे तणाव निर्माण झाला. सध्या परिस्थीती नियंत्रणात असली तरी तणावपूर्ण वातावरण आहे.
नांदेडमध्ये दररोज कोरोनाचे एक हजार हून अधिक रुग्ण सापडत असून 17 ते 18 जणांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे गुरुवारपासून टाळे बंदी करण्यात आली आहे. परंतु त्यानंतर ही आज शीख समाजाच्यावतीने हल्लाबोल मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी पोलिसांनी प्रतिबंध केल्यानंतर पोलिसांवर हल्ला करण्यात आला. त्यात 10 पोलीस जखमी झाले. संतप्त जमावाने पोलीस उपअधीक्षक यांची गाडी ही फोडली. चौरस्त्यावर घटनेचे शूटिंग करणाऱ्या अनेकांचे मोबाइल यावेळी फोडण्यात आले.