शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड-वारंगा महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू, अर्धापूर परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 16:41 IST

वनविभागाकडून अज्ञात वाहनाचा शोध सुरू, वन्यजीव प्रेमींत हळहळ

- गोविंद टेकाळे 

अर्धापूर (जि. नांदेड): नांदेड-वारंगा राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६१ वरील मौजे शनी फाट्याजवळ बुधवारी (११ मार्च) मध्यरात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत एका दीड वर्षीय बिबट्याचा (मादी पिल्लू) दुर्दैवी मृत्यू झाला. रात्री १२:४५ वाजेच्या सुमारास रस्ता ओलांडत असताना ही भीषण घटना घडली.

डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यूमिळालेल्या माहितीनुसार, नांदेडकडून वारंगाकडे जाणाऱ्या एका सुसाट वाहनाने मादी बिबट्याला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, बिबट्याच्या डोक्याला गंभीर इजा होऊन मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला आणि तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच उपवनसंरक्षक केशव वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक भरत खेलबाडे, वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल रासने आणि त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

शवविच्छेदनानंतर दहनवनविभागाने मृत बिबट्याला ताब्यात घेऊन भोकर येथील TTC केंद्रात नेले. गुरुवारी सकाळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आर. व्ही. सुरेवाड, डॉ. संजय शेळके व डॉ. अविनाश बुन्नावार यांच्या पथकाने शवविच्छेदन केले. त्यानंतर सर्व नियमांचे पालन करून मृत बिबट्याचे दहन करण्यात आले. या प्रकरणी वनविभागाने अज्ञात वाहन चालकाविरुद्ध 'वनगुन्हा' (क्र. ०१/२०२६) नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.

वन्यजीवांच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवरउन्हाळ्यामुळे पाण्याचा शोध घेण्यासाठी वन्यप्राणी महामार्गाकडे येत आहेत. रात्रीच्या वेळी वाहनांचा वेग जास्त असल्याने हे अपघात घडत आहेत. प्रशासनाने वन्यजीवांसाठी तातडीने पाणवठे तयार करावेत, अशी मागणी वन्यजीव प्रेमींकडून होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Leopard Dies in Road Accident on Nanded-Waranga Highway

Web Summary : A one-and-a-half-year-old female leopard was killed on the Nanded-Waranga highway after being hit by an unknown vehicle. The incident occurred near Shani Phata, Ardhapur, Nanded district. The forest department has registered a case and is investigating. Wildlife activists are urging authorities to create watering holes for animals.
टॅग्स :leopardबिबट्याforest departmentवनविभागNandedनांदेड