शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"चुलीत गेले नेते अन् चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण एकच आमचे लक्ष्य"; नांदेड जिल्ह्यात फलक लावून पुढाऱ्यांना गावबंदी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 18:38 IST

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मूकमोर्चा, ठोकमोर्चा, राज्य बंद अशा आंदोलनांनंतर आता पुढाऱ्यांना गावबंदचे अस्त्र उपसण्यात आले आहे.

नांदेड : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मूकमोर्चा, ठोकमोर्चा, राज्य बंद अशा आंदोलनांनंतर आता पुढाऱ्यांना गावबंदचे अस्त्र उपसण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातील सहा गावांनी पुढाऱ्यांना गावबंदी करीत वेशीवर  ‘चुलीत गेले नेते अन् चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण एकच आमचे लक्ष्य’ असे फलक लावले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पुढाऱ्यांची गोची झाली आहे. 

मराठा समाजाचे आरक्षणासाठीचे आंदोलन गेल्या काही महिन्यांत तीव्र झाले होते़ त्यासाठी अनेकांनी आत्महत्या केल्या़ आत्महत्यांचे हे सत्र अद्यापही सुरुच आहे़ परंतु, अद्यापही समाजाला आरक्षण मिळाले नाही़ त्यामुळे संतप्त झालेल्या हदगाव तालुक्यातील रुई, उंचेगाव, महातळा, पेवा आणि धानोरा या पाच ग्रामपंचायतींनी सर्व ग्रामस्थांच्या संमतीने मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत पुढाऱ्यांना गावबंदीचा निर्णय घेतला आहे़ पुढाऱ्यांनी आपली मानमर्यादा ओळखून गावात प्रवेश करावा, असा इशाराही या गावकऱ्यांनी दिला आहे. या प्रत्येक गावाच्या वेशीवर लावलेले फलक सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय झाले आहेत. तसेच राज्यातील इतर ग्रामपंचायतींनीही अशा प्रकारचा ठराव घेवून आरक्षणासाठी पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे़ या चार गावांनंतर नांदेड तालुक्यातील चिखली या गावीदेखील असा फलक लावण्यात आला आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यात सुरु झालेले हे लोण आता राज्यभर पोहोचण्याची शक्यता आहे़. 

दोन ग्रामपंचायतींनी घेतला ठराव मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत गावात पुढाऱ्यांना बंदी करण्याचा ठराव उंचेगाव आणि पेवा ग्रामपंचायतीने घेतला आहे.  पुढाऱ्यांनी आता विचार करुनच गावात पाऊल ठेवावे असा इशारा उंचेगावचे सरपंच पंजाबराव शिंदे यांनी दिला आहे़ पेवा येथे सरपंच अंकुश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष ग्रामसभेत आरक्षण मिळेपर्यंत कोणत्याच पक्षाच्या पुढाऱ्यांना गावात प्रवेश करू द्यायचा नाही, असा एकमताने ठराव घेण्यात आला़ ठरावाचे सूचक अनिल जाधव, तर अनुमोदन धनंजय जाधव यांनी दिले़  

चिखलीत तरूणांचा पुढाकारगावातील तरुणांच्या पुढाकारातून गावात फलक लावण्यात आल्याची माहिती चिखलीतील प्रभाकर शेजुळे यांनी दिली़  

आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरुच ठेवणार  मराठा समाजाने आतापर्यंत आरक्षणासाठी अनेक मोर्चे काढले़ बंद पाळले़ परंतु, आरक्षण मिळाले नाही़ आता पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे़ पुढाऱ्यांनीही मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत गावात पाय ठेवू नये. - अनिल कदम, कैलाश कदम, रूई, ता. हदगाव

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणNandedनांदेडState Governmentराज्य सरकार