पत्नीला परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारल्याने पतीचा हृदयविकाराने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 14:08 IST2019-02-23T14:08:13+5:302019-02-23T14:08:33+5:30
गजानन शंकरराव देशमुख असे मृत परीक्षार्थीचे नाव आहे.

पत्नीला परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारल्याने पतीचा हृदयविकाराने मृत्यू
नांदेड : परीक्षा केंद्रात पोहचण्यासाठी पत्नीस पाच मिनिटे उशीर झाल्याने प्रवेश नाकारण्यात आला या तणावातून पतीचा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला. ही घटना होरायझन इंग्रजी शाळेत आज दुपारी घडली घडली. गजानन शंकरराव देशमुख असे मृताचे नाव आहे.
कुरुंदा येथील गजानन शंकरराव देशमुख यांच्या पत्नी कृषी सहायक पदाची परीक्षा देण्यासाठी होरायझन केंद्रावर आल्या होत्या. यावेळी त्यांना पाच मिनिटे उशीर झाल्याने प्रवेश नाकारण्यात आला. हे समजताच गजानन यांना अस्वस्थ वाटून हृदविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. प्रवेश नाकारण्यात आल्याच्या तणावातूनच त्यांचा हृदविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.