भाषा संकुल हे लेखकांचे संकुल, नव्या पिढीला व्यासपीठ द्यावे - कुलगुरू डॉ. उद्धव भोसले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:30 IST2021-02-06T04:30:40+5:302021-02-06T04:30:40+5:30
डॉ. पृथ्वीराज तौर यांनी राबविलेल्या ‘खुली ग्रंथ पेटी’ या उपक्रमाची नोंद घेऊन कुलगुरूंनी संशोधक विद्यार्थ्यांसाठी अधिक सुविधा लवकरच ...

भाषा संकुल हे लेखकांचे संकुल, नव्या पिढीला व्यासपीठ द्यावे - कुलगुरू डॉ. उद्धव भोसले
डॉ. पृथ्वीराज तौर यांनी राबविलेल्या ‘खुली ग्रंथ पेटी’ या उपक्रमाची नोंद घेऊन कुलगुरूंनी संशोधक विद्यार्थ्यांसाठी अधिक सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील असे सांगितले.
विद्यापीठाच्या ज्ञान स्त्रोत केंद्राच्या सहकार्याने डॉ. जगदीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी भाषेतील संदर्भ ग्रंथांचे व लोकोपयोगी पुस्तकांचे तीन दिवसीय प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. ऑनलाईन पद्धतीने साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त अनुवादक अस्लम मिर्झा, डॉ. स्वाती दामोदरे, डॉ. जयद्रथ जाधव, डॉ. विठ्ठल जंबाले, डॉ. शिवराज बोकडे, डॉ. सचिन नरंगले, डॉ. निलेश देशमुख यांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच कविसंमेलनात राज्यातील नवे जुने बारा कवी सहभागी झाले होते. डॉ. पी. विठ्ठल यांच्या कवितांच्या इंग्रजी भाषांतराचा समावेश असणारा कवितासंग्रह कुलगुरुंना भेट दिला. कुलगुरूंशी झालेल्या चर्चेत डॉ. केशव सखाराम देशमुख, डॉ. रमेश ढगे, डॉ. दिलीप चव्हाण, डॉ. पृथ्वीराज तौर, डॉ. वैजनाथ अनमुलवाड, डॉ. पी. विठ्ठल, डॉ. योगिनी सातारकर, डॉ. नीना गोगटे, डॉ. झीशान अली यांनी भाग घेतला.