विद्यार्थ्यावर चाकू हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:17 IST2021-03-21T04:17:12+5:302021-03-21T04:17:12+5:30

किरकोळ कारणावरून बेल्टने केली मारहाण कंधार तालुक्यातील मौजे बोळका येथे किरकोळ कारणावरून घरात घुसून बेल्टने मारहाण करण्यात आली. ही ...

Knife attack on student | विद्यार्थ्यावर चाकू हल्ला

विद्यार्थ्यावर चाकू हल्ला

किरकोळ कारणावरून बेल्टने केली मारहाण

कंधार तालुक्यातील मौजे बोळका येथे किरकोळ कारणावरून घरात घुसून बेल्टने मारहाण करण्यात आली. ही घटना १८ मार्च रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. विलास नामदेव तरटे हे घरात असताना दोघे जण घरात घुसले. यावेळी त्यांनी साहित्याची मोडतोड करीत तरटे यांना बेल्टने मारहाण केली. या प्रकरणात कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सहा हजार रुपयांची देशी दारू पकडली

बिलोली तालुक्यातील मौजे येसगी येथे पोलिसांनी सहा हजार रुपयांची देशी दारू पकडली. १९ मार्च रोजी ही कारवाई करण्यात आली. या ठिकाणी अवैधपणे विक्रीसाठी दारुचा साठा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या प्रकरणात बिलोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

किराणा दुकानासमोर दारूची विक्री

शहरातील बिलाल नगर भागात एका किराणा दुकानासमोर दारूची विक्री करण्यात येत होती. १९ मार्च रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास पोलिसांनी या ठिकाणी धाड मारली. यावेळी साडे बारा हजार रुपयांची देशी दारू पकडण्यात आली. या प्रकरणात सपोउपनि बालाजी कुंडगीर यांच्या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सर्पदंशाने महिलेचा मृत्यू

हदगांव तालुक्यातील वरवट येथे शेतात काम करणाऱ्या एका महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाला. शोभाबाई दगडू गाडेकर ही महिला १४ मार्च रोजी शेतात काम करीत असताना विषारी सापाने त्यांचा चावा घेतला. उपचारासाठी त्यांना नांदेडातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणात वजिराबाद पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: Knife attack on student