ऊसतोड मजुराच्या मुलाचे पैशासाठी अपहरण; चार जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 13:37 IST2020-10-16T13:35:40+5:302020-10-16T13:37:03+5:30
Crime News ही कारवाई नांदेड पोलिसांनी परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे केली.

ऊसतोड मजुराच्या मुलाचे पैशासाठी अपहरण; चार जणांना अटक
नांदेड : ऊसतोडणीकरिता घेतलेले पैसे व्याजासकट परत दे; अन्यथा तुझ्या मुलाला उचलून घेऊन जातो, अशी धमकी देत २० वर्षीय मुलांचे अपहरण हादगाव तालुक्यातील कांडली गावातून करण्यात आले. पोलिसांनी तात्काळ दखल घेत अपहरण झालेल्या मुलाची अवघ्या १२ तासांत सुटका केली. ही कारवाई नांदेड पोलिसांनी परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे केली.
स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत झाला नाही पक्का रस्ता https://t.co/8UuKm68AOt
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) October 16, 2020
हदगाव तालुक्यातील तामसा हद्दीतील मौजे कांडली खुर्द येथील रामा चंदन हैबतकर (४०) हे ऊसतोड मजूर म्हणून काम करतात. बुधवारी सकाळी १० च्या सुमारास एका महिलेसह तीन पुरुषांनी कांडली (खुर्द) येथे जावून ऊसतोडणीकरिता घेतलेले ७५ हजार रुपये व्याजासह परत देण्याची मागणी केली. त्यांनी हैबतकर यांचा २० वर्षीय मुलगा चंद्रकांत याचे अपहरण केले. पोलिसात तक्रार दिल्यानंतर तात्काळ दखल घेत कारवाई करण्यात आली.
शेडमध्ये झोपेलेल्या चिमुकलीचे मध्यरात्री अपहरण
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) October 16, 2020
https://t.co/Rmi8ACmCeD